मारुळ येथे जिल्हा परिषदेच्या शाळेला वॉलकंपाऊड मंजूर !
हिंगोणा ता.यावल(प्रतिनिधी): तालुक्यातील मारूळ येथे जिल्हा परिषद मराठी व उर्दु शाळेच्या वाॅल कंपाऊंड बांधकामाला सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदचे काँग्रेसचे गटनेता प्रभाकर सोनवणे यांच्या पाठपुराव्यानंतर या वॉल कंपाउंड साठी ११ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता तसेच. मागील तडवी समाजाच्या कब्रस्थांनं मध्ये व सार्वजनीक ठिकाणी अंधार असल्यामुळे. ग्रांमस्थांनी जि.प. सदस्य प्रभाकर सोनवणे यांच्या कडे समस्या मांडल्या होत्या त्याची सोनवणे यांनी स्वत ह दखल घेऊन पाच सोलर लाईटची व्यवस्था करून दिली. तसेच जिल्हा परिषद शाळेत वॉल कंपाउंड नसल्याने शिक्षक व विदयार्थी यांना खुप त्रास सहन करावा लागत असल्यामुळे त्यांनी ही बाब जि.प. सदस्य यांच्या कडे सांगितले व . यामुळे प्रभाकर सोनवणे यांनी ग्रा.प. मारुळ यांना तात्काळ सुचना देऊन १४ वित्त आयोगातुन वॉल कंपाउंड मंजुर कले नुकतेच त्याचे सोमवारी प्रभाकर सोनवणे यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी सरपंच उषाबाई दिलीप गावडे, उपसरपंच अकीलोद्यीन फारुखी, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण हातकर, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष सय्यद अखलास, सय्यद असद, बाळू तायडे, सय्यद असलम, सय्यद अकील, एकनाथ पाटील आदींची उपस्थिती होती तेव्हा दोेन्ही शाळेच्या वॉल कंम्पाऊंडचा प्रश्न आता दुर झाला आहे.