भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

माहेरहुन पैसे आणावे म्हणुन शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह तिघांना अटक !

सावदा (प्रतिनिधी)। रावेर तालुक्यातील रायपूर येथील एका  २० वर्षीय विवाहितेने माहेरहुन पत्नीने दोन लाख रूपये आणावे यासाठी मारहाणी व मानसिक त्रासला कंटाळून विष घेवून आत्महत्या केल्याची घटना घडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्या वरती सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादी नुसार रायपूर येथे दिलेली विवाहित मुलगी कोमल चेतन पाटील (वय-२०) वडिलांचे नाव प्रभाकर काशीनाथ पाटील (वय-४०) रावेर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवाशी यांची मुलगी कोमलचा विवाह तालुक्यातील रायपूर येथील चेतन गोपाळ पाटील यांच्याशी झाला होता, त्याची नोकरी कायमस्वरूपी व्हावी यासाठी कोमलने माहेरहुन दोन लाख रूपये आणावे म्हणून तिचा मानसिक व शारिरीक छळ करण्यास सुरूवात केली. कोमलचे पती चेतन पाटील हे औष्णीक विद्यूत केंद दिपनगर येथे नोकरीला आहे. पती चेतन सह सासरे गोपाळ देवचंद पाटील व सासु जिजाबाई गोपाळ पाटील यांनी देखील मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून कोमलने २६ जुलै रोजी राहत्या घरात पिक फवारणीचे औषध घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला असून संशयित आरोपी पती चेतन गोपाळ पाटील, सासरे गोपाळ देवचंद पाटील आणि सासु जिजाबाई गोपाळ पाटील रा. रायपूर ता.रावेर आज गुरूवारी सकाळी तिघांना सावदा पोलीसांनी अटक केली असून पुढील तपास पोहेकॉ आर.डी. पवार हे करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!