मुक्ताईनगरचे नवनियुक्त पो. निरीक्षकांची पहिल्याच दिवशी अवैध धंद्यांवर धडक कारवाई ; खळबळ
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर (अक्षय काठोके)। कालच मुक्ताईनगर येथे पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झालेले रामकृष्ण पवार यांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या दोन जणांवर कारवाई करून एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला यात आरोपी राजेश गोपाळ सिंग राजपूत राहणार सीड फार्म मुक्ताईनगर याच्याकडून चार हजार रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली तसेच राजेश विजय बोदडे राहणार भिलवाड़ी मुक्ताईनगर याच्याकडून 90 हजार रुपये किमतीचे गावठी हातभट्टी दारुस लागणारे रसायन ,उकळते रसायन, गुळ मोह व दारू असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर कारवाई पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार पोलीस उपनिरीक्षक निलेश सोळुंके प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक सुदाम काकडे पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रावण जवरे ,गणेश चौधरी, गणेश मनुरे,संतोष नागरे, संभाजी बिजागरे ,कांतीलाल केदारे ,देवसिंग तायडे, नितीन चौधरी, मंगल साळुंखे तसेच होमगार्ड पथक देवेंद्र काटे ,भूषण खडसे ,अनिल शिंदे, गणेश उमाळे, निलेश घुले, मनोज पाटील महिला होमगार्ड सुशिला पाटील, वंदना जाधव, सुनंदा भोई,रेखा सैतवाल यांच्या पथकाने केली असून रुजू होताच अवैध धंद्यावर कारवाई केल्याने अवैध व्यवसाईकांमध्ये मोठी खडबड मजली आहे,मात्र या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहेत.ह्या पोलिसस्टेशन विभागा अंतर्गत मोठा परिसर असून हा परिसर विदर्भ खानदेशच्या सीमेपर्यंत आहे ,सीमेवर सातपुडा वन क्षेत्र असून या ठिकाणी नाग मनी , जुगार ,सट्टा असे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बळावले असल्याने याकडे स्थानिक पोलिस हे कायम दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून वारंवार केला जातो .
राष्ट्रीय महामार्गावरील अनेक धाबे व हॉटेलीत सोशल डिस्टनसिंग चा फज्जा उडवत रोज रात्री लाखो रु मद्य विक्रीचा धंदा विना परवानगीने जोरात सुरू असतो याला खाकीसह राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आशीर्वाद असल्याचे बोलले जात .परंतु हायवे वरील केवळ एकाच हॉटेल वर विदेशी दारू विना परवानगी अवैधरित्या विक्री होत असल्याच्या कारणावरून कारवाई करण्यात आली.
राजाश्रयाने चालणाऱ्या माफियांना का सोडण्यात आले असा सवाल देखील या वेळी उपस्थित केला जातो.शहरातील मुख्य प्रवर्तन चौकात दिवसा ढवळ्या सट्टा, ऑनलाईन सट्टा व चक्री व्हिडीओ गेम सर्रासपणे सुरू असतात यामुळे अर्थपूर्ण आशीर्वाद असल्यावरही नाईलाजाने कारवाई केली जाते
तालुक्यात जुगार अड्डे ही मोठ्या प्रमाणावर सुरू असतात या पूर्वी एकाच वेळी ५१ जुगारी जुगार खेळताना आढळून आले होते यावरून जुगार अड्डयाचे स्वरूप लक्षात येते. यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असून आणखी काही ठिकाणी जुगार अड्डे असल्याचा चर्चा मात्र रंगत असतात ,तसेच परिसरात ठिक-ठिकाणी अवैध दारूची विक्री खुलेआम सुरू असल्याचे पहावयास मिळते या दारू पिणाऱ्यांमुळे व्यसनाधिनांचे प्रमाण वाढत असून वादाचे प्रकार पाहायला मिळतात सट्टा-जुगाराचे अड्डे व अवैध दारु विक्री असे अनेक अवैध व्यवसाय या परिसरात सुरू असतात मात्र या घटनेमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले असून पोलिसांचा हा वचक असाच राहील की पुन्हा थातुर मातुर कारवाही करून पुन्हा अवैध धंदे करणाऱ्यांना रान मोकळे होईल,की ही धडक कारवाई आल्याआल्या फार्स तर नाही ना ! हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.