मुक्ताईनगर मध्ये गुन्हे शाखेच्या पथकाकडून देशी-विदेशी दारू साठा जप्त
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर (प्रतिनिधी)। येथे बेकायदा देशी विदेशी मद्य विक्री करतांना आढळून आलेल्य दोघांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत या कारवाईदरम्यान मुक्ताईनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक असे की, बेकायदा देशी विदेशी मद्य विक्री करतांना आढळून आल्याने वासुदेव लक्ष्मण कोळी व रघुनाथ बाजीराव (दोन्ही रा. मुक्ताईनगर) यांना ताब्यात घेण्यात आले असून ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.का. जितेंद्र पाटील, पोलिस नाईक किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, पो.कॉ. सचिन महाजन, ईशान तडवी यांच्या पथकाने केली आहे, त्यांच्या कब्जातून 24 हजार 655 रुपये किमतीची देशी विदेशी दारु आणि बियरचा साठा जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला मुंबई दारुबंदी कायदा कलम 65 (ई) (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.