मुख्यमंत्री ठाकरे यांचा ‘..तर तुम्ही जाऊ शकता’; अजित दादांना अप्रत्यक्ष टोला ?
मुंबई वृत्तसंस्था: महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. सप्टेंबर किंवा नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये सध्या अंतर्गत कुरबुरी सुरू असतांना दिसून येत आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली त्यावेळी ऑपरेशन लोटसच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले आहे.
यावेळी त्यांनी भाजपाच्या ऑपरेशन लोटसला अप्रत्यक्षपणे हातभार लावणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला. पालखीचे भोई होणे एवढेच तुम्हाला समाधान हवे आहे आणि पालखीचे ओझे वाहायचे असेल तर तुम्ही जाऊ शकता, असा अप्रत्यक्ष टोलाच त्यांनी यावेळी लगावला. उद्धव ठाकरे यांचा निशाणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तर नव्हता ना?, अशी चर्चा मात्र आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑपरेशन लोटस करून तर बघा असा इशारा भाजपाला दिला आहे.