भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

मॉर्निंग वॉकला जाणार्‍या युवकाला बसने चिरडले

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक (प्रतिनिधी)। मॉर्निंग वॉकसाठी रस्त्याने जात असताना बेदरकारपणे बस चालविणार्‍या अज्ञात बस चालकाने दोन जणांना चिरडले. त्यातील शिवाजीनगर येथील वैभव राजेंद्र दायमा (वय 24) यांचा जागीच मृत्यु झाला आहे.

हा अपघात पिंपळगाव येथे झाला. त्यात राकेश बाळासाहेब वाघाले हा गंभीर जखमी आहे. तर सोमनाथ गायकवाड हा थोडक्यात बचावला असून ही घटना रिलायन्स पेट्रोल पंप मुबंई महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर आज सकाळी 6.30 वाजता घडली. यात अज्ञात बस चालक बससह फरार असून चालकाविरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील वैभव, राकेश, सोमनाथ हे नेहमीप्रमाणे आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी निघाले असता रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून येणार्‍या अज्ञात बसने  निष्काळजीपणे, भरघाव बस चालवत पाठीमागून तिघांना जोराची ठोस मारली. अज्ञात बस चालक जखमी अवस्थेत असणार्‍या दोघांना  दवाखान्यात न नेता बस घेऊन फरार झाला.

या अपघातात परिसरातील शिवाजीनगर, कोळीवाडा येथे राहणार्‍या वैभव दायमा या युवकाच्या डोक्याला, चेहर्‍याला व कंबरेला आणि पोटाला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला, तर राकेश वाघाले गंभीर जखमी असून सोमनाथ गायकवाड हा बचावला आहे. गर्दीच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले असता वैभव दायमा यास डॉक्टरांनी मृत घोषित केले; तर राकेश बाळासाहेब वाघाले यास उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
अधिक तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पंडित वाघ व योगेश बुरगुले करत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!