यावल एसटी आगाराची मालवाहतूक सेवा 24 तास सुरू
यावल
(प्रतिनिधी)
दि.30: गेल्या तीन ते साडे तीन महिन्यापासून एसटीबस सेवा बंद पडली असल्याने थोडेफार उत्पन्न मिळविण्यासाठी यावल एसटी आगाराने गेल्या आठ दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मालवाहतूक सेवा सुरू केल्याची माहिती यावल आगार प्रमुख यांनी दिली. गेल्या तीन ते साडे तीन महिन्याच्या कालावधीत कोरोना विषाणूचा फटका अनेक उद्योजकांसह बहुसंख्य व्यापारी व्यवसायिकांना आणि हात मजुरी करणाऱ्यांना ट्रॅव्हल व्यवसायिकांना, प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांसह महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला सुद्धा बसला आहे, एसटी महामंडळाला फार मोठा कोट्यावधी रुपयाचा आर्थिक फटका बसला आहे त्यामुळे यावल एसटी आगाराने आपल्याला काहीतरी उत्पन्न मिळावे म्हणून इतर पर्याय शोधत मालवाहतूक एजन्सी प्रमाणे एसटी महामंडळाच्या बस मधून मालवाहतूक सुरु केली आहे, मालवाहतूक एका एसटीबस मध्ये अंदाजे दहा टन वजना इतके धान्य किंवा इतर कोणताही माल / वस्तु वाहतूक करण्याची शमता आहे माल वाहतुकीचा दर 35 रुपये प्रतिकिलो मीटर आहे, मालवाहतुकीसाठी यावल आगारात दोन मालवाहतूक एसटी बसेस त्यासुद्धा निर्जंतुकीकरण करून व्यवस्था करण्यात आली आहे, मालवाहतूक गाडीवर फक्त चालक उपस्थित राहणार आहे माल चढ-उतार करणेची जबाबदारी ही माल पाठविणारा आणी माल घेणार व्यक्तीची राहणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तर्फे यावल आगाराची ही मालवाहतूक सेवा अल्पदरात संपूर्ण राज्यात सतत 24 तास सुरू राहणार असून आतापर्यंत नवापूर, बारामती, औरंगाबाद, जळगाव इत्यादी ठिकाणी मालवाहतूक सेवा उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आली यात व्यापारी वर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळत असून एसटीबस सेवेला मालवाहतूक सेवेमध्ये मोठया विश्वासाने प्रतिसाद मिळणार असल्याचे व्यापारी वर्तुळात बोलले जात असल्याची माहिती यावल आगार प्रमुख एस.व्ही.भालेराव वाहतूक नियंत्रक जी.प
ी.जंजाळे
यांनी दिली.