यावल तालुका प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांचा धसका; १५ दिवसानंतर तात्काळ उभारले कंटेनमेंट झोन, नागरिकांमध्ये तिव्र संताप !
यावल (सुरेश पाटील)। दिनांक 5 सप्टेंबर 2020 शनिवार रोजी जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत हे स्वतः यावल तालुक्यातील कोरोना परिस्थितीचे कामकाज कसे सुरू आहे याबाबतची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे वृत्त यावल तालुका प्रशासनाला कळताच यावल शहरात तब्बल 15 दिवसानंतर कंटेनमेंट झोन उभारले गेले, कंटेनमेंट झोनमधील पॉझिटिव्ह रुग्ण आणि संबंधित खुलेआम भ्रमण करीत असल्याने यावल शहरात तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत यावल शहरातून माहिती घेतली असता दिनांक 19 ऑगस्ट2020 रोजी व त्यानंतर आरोग्य विभागाच्या तपासणीत जे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले होते आणि आहेत त्या वेळेला म्हणजे त्या दिवशी यावल नगरपरिषदेने त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन /प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले नव्हते आणि त्या ठिकाणी कोणतेही बॅरेकेट्स लावलेले नव्हते. तसेच या वाड्यात गल्लीत कोरणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत ते रुग्ण खुलेआम संपूर्ण यावल शहरात भ्रमण करीत आहे ? यात काही व्यवसायिक सुद्धा खुलेआम भ्रमण करीत आहेत. ज्या ठिकाणी कोरूना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्यांच्या घराजवळ प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून बेरॅकेटस लावले नव्हते, हे रुग्ण आठ दिवसानंतर निगेटिव झाले आहेत अशी वस्तुस्थिती असताना दिनांक पाच सप्टेंबर 2020 शनिवार रोजी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत हे यावल तालुका दौऱ्यावर येणार असल्याचे वृत्त प्रशासनाला कळताच प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आणि त्यांनी यावल शहरात सुतार गल्ली परिसरात श्रीकृष्ण मंदिराजवळ आणि मिलन कोल्ड्रिंक जवळ तात्काळ कंटेनमेंट झोन उभारले यामुळे ज्या त्या परिसरातील नागरिका मध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.