यावल तालुक्यात अवैध गो वाहतूक आणि अवैध कत्तलखाने; गोरक्षकांने पकडून दिलेले वाहन पोलिसांच्या हातून निसटले, पोलिस, प्रशासन अकार्यक्षमतेमुळे जातीय सलोखा धोक्यात !
आज श्रावण सोमवार सकाळची घटना,नगरपरिषद आणि ग्रामपंचायत हद्दीत अवैध कत्तलखाने..
सुरेश पाटील
यावल (प्रतिनिधी)। शहरासह यावल तालुक्यात अवैध –गो– वाहतूक आणि अवैध कत्तलखाने सुरू असल्याने तसेच पोलिसांसह संबंधित प्रशासनाचे अकार्यक्षमतेमुळे आज दिनांक 27 श्रावण सोमवार रोजी सकाळी अवैध व वाहतूक करणाऱ्या एका वाहनास एका गोरक्षकांनी पकडून पोलिसांना सूचना देऊन वाहन पकडण्याचा प्रयत्न केला असता गो वाहतूक करणारे वाहन पोलिसांच्या तावडीतून निसटल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दि.25 जुलै 2020 शनिवार रोजी यावल पोलीस स्टेशन आवारात गो रक्षकांची आणि यावल पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील यांची एक महत्वाची वेगवेगळी बैठक घेऊन पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या आणि आहेत. कुठेही गैरप्रकार दिसल्यास पोलिसांना माहिती द्या कायदा हातात घेऊ नका असे यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी गोरक्षकांना सांगितले. त्याचप्रमाणे यावल पोलीस स्टेशन हद्दीत प्रत्येक पोलीस पाटील यांनी आपल्या गांवात घडणाऱ्या घटनांची वस्तुस्थिती जन्य माहिती यावल पोलीस स्टेशनला तात्काळ कळवायला पाहिजे अशा सुद्धा सूचना पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी उपस्थित सर्व पोलीस पाटील यांना दिल्या आहेत.
पोलीस पाटील हे पोलिसांचे नाक कान डोळे असल्यामुळे त्यांनी गांवातील घडलेल्या कोणत्याही घटनेची माहिती तात्काळ यावल पोलीस स्टेशनला दिल्यास किरकोळ स्वरूपाचे भांडण-तंटे आणि गंभीर गुन्ह्यांसह अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात आळा बसेल.
कायदा हातात घेऊ नका अशा सूचना गो रक्षकांना दिल्या असल्या तरी मात्र प्रत्यक्षात यावल पोलिसांच्या दुर्लक्ष पणामुळे यावल पोलीस स्टेशन हद्दीत सर्रासपणे खुलेआम गो वाहतूक, गुराढोरांची वाहतूक वाहनातून अवैधरित्या करण्यात येत असून अनधिकृतपणे कत्तल सुद्धा करण्यात येत आहे गो हत्यासह ईतर गुऱाची कत्तल करणारेसह इतर मांस विक्रेत्यांनी यावल नगरपरिषदेकडून किंवा ग्रामपंचायत स्तरावरून कोणतेही अधिकृतरीत्या परवानगी घेतलेली नसताना दररोज खुलेआम सर्रासपणे गुर–ढोरांची व इतर प्राण्यांची कत्तल कोणत्या नियमानुसार केली जात आहे ? याकडे नगरपालिका ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनासह पोलिसांचे सुद्धा अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने संबंधित सर्व यंत्रणा सर्वोच्च न्यायालय आदेशाची पायमल्ली करीत असल्याचे सुद्धा संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे. आज दिनांक 27 श्रावण सोमवार या दिवशी एका गोरक्षकांने गो वाहतूक करणारे एक वाहन यावल पोलिसांना सूचना देऊन बुरुज चौकातून प्रत्यक्ष पकडून दिले असले तरी त्या वाहनाचा पाठलाग करीत असताना ते वाहतूक करणारे वाहन यावल पोलिसांच्या तावडीतून निसटले कसे ? ते वाहन यावल पोलिसांनी यावल पोलीस स्टेशनला जमा केले नाही ? वाहनावरील संबंधित दोन-तीन जणांना यावल पोलीस स्टेशनला चौकशीकामी वाहना व्यतिरिक्त का आणले गेले ? गो वाहतुक करणारे ते वाहन कोणाचे ? याबाबत सुद्धा यावल शहरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून यावल पोलिसांनी अवैध गो वाहतूक करणाऱ्यांवर आणि अनधिकृतपणे कत्तल करणाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करावी.
अवैध गो वाहतूक आणि गोहत्या यामुळे संपूर्ण यावल तालुक्यातील जातीय सलोखा धोक्यात येऊ नये म्हणून तसेच तालुक्यात कोणत्याही ठिकाणी गो हत्या होऊ नये म्हणून पोलिसांनी तात्काळ कडक कारवाई न केल्यास यावल तालुक्यात मोठ्या स्वरूपात आंदोलन छेडले जाईल असे संपूर्ण तालुक्यात बोलले जात आहे. याबाबत यावल पोलीस स्टेशनला आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास चौकशी केली असता संबंधितांचे जाब जबाब घेऊन चौकशी सुरू असल्याचे समजले. प्रत्यक्षात काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.
Pingback: मंडे टू मंडे इम्पॅक्ट; गोवंश तस्करी, हत्या प्रकरणी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींना अटक, य