भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

यावल तालुक्यात अवैध वाळू वाहतूक सुरूच ,डांभुर्णी येथे वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

यावल ( सुरेश पाटील) यावल तालुक्यात ठिक–ठिकाणी अवैध अनधिकृत वाळू व इतर गौण खनिजाची अनधिकृत वाहतूक सुरुच असल्याची घटना आज तालुक्यातील डांभुर्णी गावाजवळ प्रत्यक्ष भरारी पथकाला दिसून आली.भरारी पथकाने वाळूने भरलेले एक ट्रॅक्टर पुढील कार्यवाहीसाठी यावल पोलिसांकडे ताब्यात दिले आहे. यामुळे अनधिकृत बेकायदेशीर वाहतूकदारामध्ये मध्ये मोठी खळबळ उडाली.


दिनांक 16 रोजी सकाळी 5:30 वाजेच्या सुमारास डांभुर्णी गावाजवळ ट्रॅक्टर क्र.एम.एच. 19– 9802 मधील ट्रॉलीमध्ये अंदाजे दिड ब्रास वाळू अनधिकृतपणे वाहतूक करीत असताना भरारी पथकातील प्रमुख निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार फैजपुर तलाठी, आमोदा तलाठी यांना आढळून आले. भरारी पथकाने वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरचा पंचनामा डांभुर्णी गावातील पंच रुपेश रामकृष्ण शंकपाळ व किरण भास्कर कचरे यांच्या उपस्थितीत स्वाक्षरीने करून ट्रॅक्टर पुढील कार्यवाहीसाठी यावल पोलिसांच्या ताब्यात दिले

अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांवर नियुक्त भरारी पथकाकडून तालुक्यात ठिकठिकाणी अचानक कारवाई होत असली तरी अवैध वाळू वाहतूक अद्याप बंद झालेली नाही यावल शहरात अधिकारी आणि पोलीस वर्ग झोपल्यानंतर रात्रीच्या वेळेस आणि सकाळी2ते 6 वाजेच्या दरम्यान ट्रॅक्टर,डंपर वाळू भरून सुसाट वेगाने वाळूची वाहतूक करणारी वाहने धावत असतात यात प्रचंड वाहतुकीच्या आवाजामुळे(ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मोठा आवाजाने)विकसित भागातील नागरिकांमध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे तरी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध ठोस निर्णय घेऊन यावल पोलीस व महसूल विभागाने बेधडक कार्यवाही करावी असे संपूर्ण तालुक्यात बोलले जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!