यावल तालुक्यात गोठा योजनेचा बट्ट्याबोळ; गुरे-ढोरे व शेळी पालन गोठा निधीत मोठा भ्रष्टाचार ;
फैजपूर ता,यावल (विशेष प्रतिनिधी)। मनरेगा या योजने अंतर्गत ग्रामीण पातळीवर गुरेढोरे व शेळीपालन करण्यासाठी प्रत्येक पात्र धारकास प्रत्येकी ९० हजार रुपये गोठा बांधण्यासाठी अनुदान दिले जाते त्या आधारे यावल तालुक्यात पंचायत समितीच्या माध्यमातुन शेळीपालन व गुरेढोरांचे पालन करण्यासाठी शासनाच्या वतीने ग्रामीण पातळीवर नागरीकांना गोठे उभारणीसाठी दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये मोठा भ्रष्ठाचार झाल्याचे उघडकीस आले असुन या प्रकरणातीत निधीचा दुरुपयोग करणाऱ्यांना पंचायत समितीच्या वतीने नोटीसा पाठविण्यात आल्या असून या गैरव्यवहारात अधिकारी सुद्धा सामील असून ,हे अधिकारी कोण ? या गैरव्यवहारात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली जाते याकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागुन आहे.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ . निलेश पाटील यांनी दोन दिवसापुर्वीच गोठयाच्या योजनेत हिंगोणा गावात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याच्या अनेकांच्या तक्रारी प्राप्त झाल्याने या पार्श्वभूमीवर याची तात्काळ दखल घेत गटविकास अधिकारी पाटील यांनी गोठयां साठी दिलेल्या अनुदानाच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी हिंगोणा गावाला भेट देवुन गोठयांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या घरी जावुन प्रत्यक्षात पाहणी केली .या चौकशीत ज्या लाभार्थ्यांनी गोठयाचा लाभ घेण्यासाठी शासनाकडुन अनुदान मिळवले त्यांनी प्रत्यक्षात गोठे बांधलेच नसल्याचे निदर्शनास आल्याने अशा लाभार्थ्यांना शासनाच्या निधीचा दुरुपयोग केल्याप्रकरणी नोटीसा पाठविण्यात आल्या असुन शासनाची फसवणुक करून गोठा अनुदानाचा दुरुपयोग केल्यामुळे संबंधीतांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे ,
मनरेगा या योजने अंतर्गत सन २०१९ ते २०२० च्या कार्यकाळात यावल तालुक्यात सुमारे १२५ लाभार्थ्यांना या गोठयांचे साठीचे जवळपास १ कोटीचे अनुदान देण्यात आले असुन यातील काही मोजक्याच लाभार्थ्यांनी गोठयाची बांधणी केली असुन इतर लाभार्थ्यांनी मात्र या योजनेचा दुरुपयोग करून मोठया प्रमाणावर अनुदान लाटण्याचे कार्य केले आहे , यावल तालुक्यात गोठयांच्या योजनेचा बटयाबोळ झालेला असून या अनुदान योजनेच्या दुरूपयोगात ज्या अधिकाऱ्यांचा सहभाग आहे त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे,