यावल नगरसेवकांसह प्रशासनाचे सार्वजनिक आरोग्याकडे दुर्लक्ष
यावल (प्रतिनिधी)। येथील नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील शहरामधील विविध प्रभागात डेंग्युने थैमान घातले असुन, वेगाने वाढणाऱ्या या मानवी जिवनाला अत्यंत धोकादायक अशा डेंग्युच्या आजाराने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोणातुन गांर्भीयांने विचार करून नगर परिषद प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुख्याधिकारी यांना देण्यात आलेल्या लिखित निवेदनाव्दारे केली आहे .
या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की यावल शहरात डेंग्यु या आजाराने थैमान घातले असुन शहरातील अनेक भागात डेंग्युचे रुग्ण आढळले आहेत. डेंग्यु आजाराच्या या वाढत्या रूग्णसंख्येने नागरीक आपल्या कुटंबाच्या आरोग्याला घेवुन चिंतेत व भयभीत झाले आहे. नगर परिषद प्रशासनाचे या विषयाकडे पुर्णपणे दृर्लक्ष होत असल्याने शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शहरातील अनेक विस्तारीत भागात गटारी नसल्याने नागरीकांनी घाणीचे पाणी थांबवण्या करीता सोच खड्डे तयार केले असुन त्यात साचणारे घाणीचे सांडपाण्यामुळे तसेच शहरातील अनेक भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहेत. ज्या प्रभागात गटारी बांधलेल्या आहेत त्या ठीकाणच्या गटारी स्वच्छ करण्यात येत नसल्याने गटारी या दुर्गंधीच्या पाण्याने तुबंलेल्या आहे. नागरीकांच्या वारंवार तक्रारी नंतर देखील नगर परिषद प्रशासन या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसुन येत आहे. यावल शहरातीत अनेक मुलांना डेंग्यु या घातक आजाराची लागण झाली असून त्यांनी खाजगी रुग्णालयात आपले उपचार करून घेतले आहे किंवा करीत आहे. डेंग्यु या आजारापासुन नागरीकांना सुरक्षा प्रदान करण्याकरीता ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने गप्पी मासे सोडण्याचे आदेश देण्यात यावे. ज्या प्रभागात डेंग्युचा रुग्ण आढळुन आल्यास त्या रूग्णाच्या उपचाराचा संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी मनसे स्टाईलने प्रभाग नगरसेवकाकडुन वसुल करणार असल्याचा ईशाराही दिला आहे. या विषयाची नोंद गांर्भीयाने यावल नगर परिषदच्या सन्मानिय नगरसेवकांनी घ्यावी अथवा नगर परिषद प्रशासनाने काळजी पुर्वक तात्काळ शहरात धुर फवारणी करावी व नागरीकांना डेंग्युच्या आजारापासुन सुरक्षा प्रदान करावी तसे न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही नागरीकांच्या आरोग्य हिता आंदोलनाचा मार्ग पत्कारणार असल्याचे मनसेचे शहराध्यक्ष चेतन अढळकर, सोहन धांडे, आबीद कच्छी, नितिन डांबरे, किशोर नन्नवरे, ईस्माइल खान, शाम पवार, अक्षय भोईटे यांनी मख्यधिकारी बबन तडवी यांना दिलेल्या निवेदनाव्दारे ईशारा दिला आहे.