भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलसामाजिक

यावल येथील संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले जशने ए पहेरहन ची मिरवणुक कोरोनामुळे रद्द !

यावल (सुरेश पाटील)। सुमारे शंभर वर्षाहुन अधिक वर्षाची परपरा असलेला आणि राज्यात एकमेव यावल येथेच साजरा होत असलेला मुस्लीम बांधवांचा जशने पेहरन-ए-शरीफ उत्सव गुरूवारी दिनांक ३ सप्टेंबर २० रोजी यावल येथे यंदा हे उत्सवअगदी साद्या पधदतीने साजरा होत आहे.

या वर्षी कोरांना विषाणु संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खिर्नीपुरा पंचकमीटीच्या वतीने पेहरन मिरवणूक न काढता शासकीय नियमांचा सन्मान करीत प्रसिद्ध डोलीची जागेवरच पाच जणांच्या उपस्थितीत पुजा अर्चना करून उत्सव साजरा केला जाणार आहे. दरवर्षी उत्सवाच्या निमित्ता राज्यभरातून पाहुण्यांची राहत असलेली वर्दळ मात्र यावर्षी राहणार नाही. यावल येथे सालाबादप्रमाणे पारंपरिक पद्धीतीने मोठया उत्सहाच्या वातावरणात उत्सवास सुमारे १०० वर्षाहून अधिक परंपरा असलेल्या उत्सव आहे. उर्दु वर्षाानुसार दरवर्षी मोहरमच्या १४ तारखेस हा उत्सव राज्यात केवळ यावल येथे साजरा होत अस्ल्याने राज्यासह परराज्यातील मुस्लीम बांधव येथील त्यांच्या नातलगाकडे हजेरी लावतात. मात्र या वर्षी कोरोना संसर्गाचे पार्श्श्वभुमीवर बाहेरील पाहुणे मंडळी येथे येणार नसल्याने समाज बांधवांच्या आंनदावर विरजन पडले आहे. या उत्सवात हिंदु बांधवही मोठया संख्येने सहभागी होतात. यावर्षी उत्सवाचे आयोजन खिार्नीपुरा पंच कमीटीने केले आहे.
उत्सवाची परंपरा

या उत्सवास सुमारे शंभर हून अधिक वर्षाची परंपरा आहे.येथील नजमोद्यीन अमीरोद्यीन यांनी बगदाद येथील सय्यदना गौसे आजम दस्तगीर यांचे पेहरन आणले होते. त्यास तब्बरूक (पवित्र वस्त्र)असे म्हणतात. या पवित्र वस्त्राची दरवर्षी सजविलेल्या डोलीतून शहरातून वाद्यवृंदाच्या गजरात धार्मीक गीत गात मीरवणूक काढण्याची प्रथा आहे. मात्र यावर्षी ही मीरवणूक निघणार नाही. उत्सव समीतीचे सैय्यद युनुस सैय्यद युसुफ, गुलामरसुल हाजी गु. दस्तगीर, हाजी इकबाल खान नसीर खान, कमरुद्यिन शेख, हाजी गफफार शाह , भुरा शाह, आदिचा पंच कमीटीत समावेश आहे.बुधवारी सांयकाळी येथील पो. ठाण्यात प्रभारी पोलीस निरिक्षक अवतारसींग चव्हाण यांचे दालनात पंच कमीटीच्या सदस्याची बैठक होवून शासकीय नियमाय बांधिल राहुन उत्सव साजरा करण्याचे सांगीतले. कोरोना विषाणुसंसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा पहेरहनच्या मिरवणुकीचा कार्यक्रम रद्द झाल्याने पहेरहनच्या दुसऱ्या दिवशी होणारे कुस्त्यांची दंगल ही होणार नसल्याने कुस्ती मल्लांचाही हिरमोड झाला आहे दरवषी दुसरे दिवशी येथील हडकाई नदिपात्रात कुस्त्यांची आम दंगल आयोजीत करण्यात येते मात्र यावर्षी ती रद्य करण्यात आल्याने मलंचा हिरमोड झाला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!