यावल शहरातील अंटीजन तपासणीत 4 विक्रेते कोरोना पॉझिटिव्ह !
यावल ( प्रतिनिधी)। आज दि.21 रोजी यावल ग्रामीण रुग्णालयात शहरातील 200 व्यापारी व भाजीपाला विक्रेत्यांच्या अँटीजन तपासणीत 4 व्यापार्यांचे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आढळून आले.
कोरोना विषाणूची बाधा होऊ नये म्हणून प्रत्येक व्यापारी आणि भाजीपाला विक्रेत्यांची अंटीजन तपासणी करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे आज दिनांक 21 शुक्रवार रोजी यावल शहरातील व्यापाऱ्यांची तपासणी दुपारी 2 ते 5 वाजेच्या दरम्यान यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बी.बी. बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली औषध निर्माण अधिकारी सूर्यकांत पाटील, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी नानासाहेब घोडके यांनी केली त्यात आज एकूण 200 व्यापारी, भाजीपाला विक्रेत्यांच्या तपासणित 4 विक्रेत्यांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आढळून आला. ही तपासणी झाली नसती तर 4 व्यक्तींच्या माध्यमातून तसेच संपर्कामुळे अनेकांना कोरोना विषाणूची बाधा झाला असती असे सुद्धा यावल शहरात बोलले जात आहे. संपूर्ण व्यापारी आणि भाजीपाला विक्रेत्यांची अंटीजन तपासणी करण्याचा शासनाचा निर्णय आरोग्य हिताच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा ठरणार असल्याने तसेच यामुळे कोरोना विषाणूची बाधा इतरांना होण्याचे प्रमाण फार कमी होईल असे सर्वस्तरातून बोलले जात आहे.