भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नगरपालिकायावलसामाजिक

यावल शहरात आठवडे बाजार बंद परंतु बेकायदा असलेले चिकन मटण सेंटर सुरू; यावल नगरपरिषद आणि यावल पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष !

सुरेश पाटील
यावल (प्रतिनिधी)। कोरोना विषाणूची बाधा नागरिकांना होऊ नये म्हणून यावल नगरपरिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांच्या आदेशान्वये गेल्या दोन महिन्यापासून यावल येथे शुक्रवारी भरणारा आठवडे बाजार बंद करण्यात आलेला आहे. परंतु यावल नगर परिषदेकडून कोणतीही अधिकृत परवानगी न घेता यावल शहरात ठिक– ठिकाणी चिकन सेंटर आणि बोकडा मार्केट खुलेआम सुरू असल्याने संपूर्ण यावल शहरातील नागरिकांमध्ये आणि व्यापारी वर्तुळात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे याकडे यावल नगरपरिषदेचे आणि यावल पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.

यावल शहरात कोरणा बाधित रुग्णांची संख्या मर्यादित असली तरी ग्रामीण भागात कोरोना विषाणू रुग्णांची संख्या वाढती असल्याने गेल्या दोन महिन्यापासून यावल तालुक्यातील नागरिक आणि किरकोळ भाजी–पाला विक्रेते आणि इतर व्यवसायिक विविध कामानिमित्त, व्यवसायानिमित्त किंवा बाजारा निमित्त यावल शहरात येऊ नये म्हणून आणि यावल शहरात कोरोना बाधित रुग्ण वाढू नये म्हणून यावल नगर परिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांनी सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि यावल शहरातील व्यापारी असोसिएशन मंडळाची बैठक घेऊन यावलचा आठवडे बाजार बंद ठेवणे बाबत सूचना दिल्या होत्या आणि आहेत. त्यानुसार गेल्या दोन महिन्यापासून यावल शहरात दर शुक्रवारी भरणारा आठवडे बाजार बंद आहे. यावल शहरातील संपूर्ण व्यवसायिक आपापली दुकाने आणि व्यवसाय दर शुक्रवारी 100% बंद ठेवीत असतात परंतु यावल शहरात ठिक– ठिकाणी तसेच मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेले चिकन- मटण सेंटर चालक यावल नगरपालिकेकडून कोणतेही अधिकृत परवानगी / परवाना न घेता, सोशल डिस्टन्स न पाळता, मास्क न लावता तसेच दुकानाजवळ कोणतीही ही साफसफाई व सुविधा न बाळगता बेकायदा चिकन- मटन सेंटर भरदिवसा यावल नगरपालिका व प्रशासनाच्या नाकावर टिचून आपला व्यवसाय करीत असल्याने संपूर्ण यावल शहराचे आरोग्य धोक्यात आलेले आहे यामुळे एखाद्या वेळेस यावल शहरात मोठ्या प्रमाणात साथीचा रोग पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तरी यावल नगर परिषद व यावल पोलीसांनी संयुक्त मोहीम राबवून यावल शहरातील अवैध चिकन सेंटर, बोकडा मार्केट बंद करावे अशी मागणी संपूर्ण यावल शहरातून होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!