रस्ते सोडून प्रतिबंधित क्षेत्र तयार करावे- शिवसेना शहराध्यक्ष मिलिंद पाटील
सावदा (प्रतिनिधी)। शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातून (कॉन्टेमेंट झोन) जाणारा रस्ता मोटरसायकल व पायी येजा करणाऱ्यासाठी मोकळा करण्यात यावा या मागणीचे निवेदन सावदा शिवसेना शहराध्यक्ष मिलिंद पाटील यांनी मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.
प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या परिसरातील काही मुख्य रस्त्यावर येत असल्याने यात काही सुधारणा करण्यात यावी, शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळलेला परिसर हा नगरपालिका प्रशासनतर्फे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असतो. यात काही प्रतिबंधित क्षेत्र हे मुख्य रस्त्यावर येत असल्याने यात काही सुधारणा करून या क्षेत्रातून जाणारा रस्ता मोटर सायकल व पायी जाता येईल असा मोकळा करण्यात यावा. यामुळे प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर परिसरातील नागरिकांना त्या रस्त्याने जाण्याचा त्रास कमी होईल. शहरातील प्रतिबंधित क्षेत्र लहान करून पायी व मोटरसायकल जाण्यासाठी मार्ग ठेवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर शिवसेना महानगराध्यक्ष मिलिंद पाटील, भरत नेहते, शरद भारंबे, धनंजय चौधरी,शाम पाटील, अनिल लोखंडे आदींच्या स्वाक्षरी आहे.