रावेरला गोडावून अभावी रखडलेली मका खरेदी सुरू- तहसीलदार देवगुणे
रावेर (प्रतिनिधी) । रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा मका खरेदीचे काम बऱ्याच दिवसांपासून बंद होते. मका खरेदी करण्यासाठी गोडावूनची उपलब्धता नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत होते. आता मात्र आज पासून मका खरेदीस सुरूवात होत असुन तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी गोडावून उपलब्ध करून दिले आहे.
शासनाकडून मक्याला एक हजार 760 रू. भाव निश्चित करण्यात आला मात्र तालुक्यातील खरेदीसाठी गोडावूनची उपलब्धता नसल्याने प्रशासनाची व शेतकऱ्यांची गैरसोय होत असल्याचे दिसुन आले. रविवारच्या दिवशी तहसिलदार उषाराणी देवगुणे यांच्याकडून महेंद्र पाटील यांचे भोकरी रोडवरील गोडाऊन खरेदी केंद्रासाठी उपलब्ध करून देण्यात आले असून तालुक्यातील 1200 शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी नोंदणी केली आहे. खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार आहे.