भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयरावेरसामाजिक

रावेर तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे मंदिरे उघडण्यासाठी घंटा नाद आंदोलन !

रावेर (प्रतिनिधी)। आज शनिवार भारतीय जनता पार्टी रावेर तालुक्याच्या वतीने श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारकडून देवस्थाने भक्तांसाठी खुले करण्यासाठी परिपत्रक या पुर्वीच काढले आहे व त्या नुसार देश भरातील देवस्थाने खुली करण्यात आली आहे.


परंतु राज्यातील आघाडी सरकारने त्यावर कुठल्याही कार्यवाही केलेनाही व भक्तांसाठी मंदिरे खुले केली नाही. त्यासाठी कुंभकर्णपेक्षा गाढ झोपलेल्या ठाकरे सरकार इशारा देण्यासाठी राज्यभर दार उघडा उध्ववा दार उघड अशी हाक देवून घंटानाद आंदोलन करण्यात आले. तसेच रावेर येथे भाजपा तर्फे आंदोलन केले व धुळे येथे अ.भा.वि.प.च्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्ते पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना फि माफीचे निवेदन देतांना पालक मंत्र्या समोर पोलिसांनी विद्यार्थीनवर केलेल्या अमानुष लाठी हल्यांचा निषेध सुध्दा करण्यात आला. यासंबंधी मा.तहसीलदार साहेब यांना निवेदन सुद्धा देण्यात आले. या प्रसंगी भाजपा ता.अध्यक्ष राजन लासुरकर, जि.उपाध्यक्ष पद्माकर महाजन, प.स.सभापती जितेंद्र पाटील, कु.उ.बा.समिती सभापती श्रीकांत महाजन, ता.सरचिटणीस सी.एस.पाटील सर, प.स.उपभापती जुम्मा तडवी, गटनेते प.स.पि.के.महाजन, जि.यु.मो.उपाध्यक्ष अमोल पाटील, यु.मो.ता.अध्यक्ष महेंद्र पाटील, ता.सरचिटणीस यु.मो.खेमचंद्र धांडे, प.स.सदस्य हरलाल कोळी, संदिप सावळे, रावेर शहर अध्यक्ष दिलीप पाटील, माजी अध्यक्ष मनोज श्रावक, सरपंच सिंगत प्रमोद पाटील,सोशल मीडिया सहप्रमुख विनोद कोळी, दुर्गादास पाटील, नगिनदास चौधरी, वसंत महाजन, अमित पाटील, माधव चौधरी, पंकज चौधरी, व कार्यकर्ते उपस्थित होते

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!