भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्यारावेर

रावेर तालुक्यातील १० रुग्णांचा कोरोना तपासणी अहवाल बाधित !

रावेर (प्रतिनिधी)। तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालल्याचे दिसून येत असून काल रात्री उशिरा आलेल्या अहवालांमध्ये तालुक्यात पुन्हा १० रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले असून त्यात निंभोरा गावातील ९ व विवरे गावातील १ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.

सदरील निंभोरा येथील नऊ रुग्णांमध्ये ६ महिला व ३ पुरुषांचा समावेश असून यामध्ये १ पुरुषांचा अहवाल खाजगी लॅब चा असून सदरील रुग्ण इंदिरा नगरातील हनुमान नगर, कोळी वाडा, बस स्टँड या परिसरातील रहिवासी आहे. निंभोरा येथे तब्बल ९ रुग्ण बाधित आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली असून एकुण रुग्ण संख्या १४ झाल्याने चिंता व्यक्त होत आहे तर विवरे येथील एका आधी बाधित आलेल्या ७० वर्षीय वृद्ध महिलेचा अहवाल पुन्हा बाधित असल्याचे आढळून आल्याने गावकऱ्यांच्या चिंतेत भर पडली असून विवरे गावातील बधितांची संख्या ३० असून त्यातील २९ रुग्ण कोरोनाला मात देत घरी परतले आहे. तालुक्यात बाधितांची दिवसागणित वाढती संख्या चिंतेत भर घालणारी असून नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

मंडे टू मंडे तर्फे आवाहन –

कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!