भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Uncategorized

रावेर पंचायत समितीत शौचालय घोटाळ्याची व्याप्ती मोठी– एकनाथ खडसेंची चौकशीची मागणी

रावेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा :  रावेर पंचायत समितीत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गरीबांना वैयक्तिक शौचालय बांधकाम अनुदानात घोटाळ्यात एक किंवा दोन व्यक्ती नसून याची व्याप्ती मोठी असून त्यामुळे या घोटाळ्याचा मुळापर्यंत जाऊन तपास करण्याची जबाबदारी पोलीसांवर असल्याचे सांगत जिल्ह्यातील शौचालय योजनांची चौकशीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथराव खडसे यांनी केली आहे.

रावेर पंचायत समितीत गरीबांना वैयक्तिक शौचालय योजनेत घोटाळ्याचे प्रकरण समोर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणात राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी बोलतांना सांगितले, माझ्या मतदारसंघातील हा विषय असून पोलिसांनी रावेर तालुक्यातील वयक्तीक शौचालय योजना व सार्वजनिक शौचालय योजनांची संपूर्ण चौकशी करावी. लाभार्थीची यादीत नाव असतांना शौचालय बांधकाम केले किंवा नाही. शौचालय बांधकाम जुने दाखवून नविन शौचालय बांधकामांची बिल काढली का.? वयक्तीक शौचालय न बांधताच बिल काढली का.? शौचालय बांधकामाचे मस्टर व्यवस्थित आहे का.? मस्टरवर सह्या असणारे तेच व्यक्ती आहे का ? यात बिडिओ लेखापाल यांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली आहे का? असे प्रश्न उपस्थित करत या संपुर्ण प्रकरणाचे इन्वेस्टीकेशन पोलिसांनी करण्याची गरज असलेल्याचे माजी मंत्री खडसे यांनी म्हटले आहे. याप्रकरणी आरोपींच्या शोध पोलिस घेत आहे.

सदरील प्रकरण नेमके काय ? दिड कोटींचा भ्रष्ट्राचाराचा आरोप

यामध्ये गट समन्वय समाधान निंभोरे यांनी ओळखीच्या लोकांच्या खात्यावर स्वच्छ भारत मिशनच्या खात्यावरुन १ कोटी ५१ लाख ६१ हजार ५३३ वर्ग केल्याचा आरोप आहे. तसेच स्वता:च्या खात्यावर १२ हजार प्रमाणे ३३ वेळा ६ लाख ४ हजार ४७७ रुपये वर्ग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.तसेच  समूह समन्वयक मंजुश्री पवार यांनी १२ हजार रुपये प्रमाणे ३५ ओळखीच्या लाभार्थीच्या नावे ४ लाख २० हजार वर्ग करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच बीडीओ यांच्या खोट्या स्वाक्ष-यांच्या याद्या बँकेला दिल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे. याप्रकरणी रावेर पोलीसात दोन जणांवर दाखल गुन्ह्यात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!