भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्यारावेर

रावेर मधील जनता कर्फ्यू विरोधामुळे रद्द !

रावेर (प्रतिनिधी)। जिल्ह्यासह तालुक्यातही कोरोनाचा वाढता प्रभाव दिसत आहे तर रावेरशहरात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित आढळून आल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालिकेच्या नगरसेवकांनी शहरात जनता कर्फ्यू पाळण्यासाठी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना निवेदन देऊन मागणी केली होती, त्यानुसार दि.१३ जुलै ते १९ जुलै दरम्यान कर्फ्यू पाळण्याची परवानगी देण्यात आली होती

परंतु शहरातील विविध पक्षांच्या पदाधिकारी यांनी हा जनता कर्फ्यू पाळू नये,आधीच नागरिक लॉकडाऊन मुळे होरपळले असून हाताना काम नाही, बेरोजगारी आणि उपासमारिचा सामना करत आहे, आताच कुठे लोक कामाच्या शोधात आहे, अशा कठीण काळात जनता कर्फ्यू लादून लोकांवर वाईट प्रसंग आणू नये अशी भूमिका घेतली गेल्याने शहरातील जनता कर्फ्यू रद्द झाला आहे. याबाबत मुख्याधिकारी यांनी देखील दुजोरा दिला आहे. आज रविवारी सायंकाळी विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी तहसील व पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन जनता कर्फ्यू लादून नागरिकांच्या अडचणी वाढतील.यासाठी कर्फ्यू न लावता उपाय योजना आखून त्यावर भर दिली तर नागरिकांवर उपासमारीची वेळ येणार नाही अशी भूमिका मांडून जनता कर्फ्यू पाळणार नाही असे निवेदन दिल्याने सोमवार पासून ७ दिवस पाळला जाणारा जनता कर्फ्यू रद्द झाला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!