भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावताज्या बातम्यामुक्ताईनगर

रावेर लोकसभा क्षेत्रात 39 व्हेंटिलेटर उपलब्ध खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांना यश !

जळगाव(प्रतिनिधी)। जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून आतापर्यंत 5700 हुन अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर मिळत नसल्याने व्हेंटिलेटरच्या प्रतीक्षेत जीव गमवावा लागत असल्याचे वास्तव आहे.

मागील महिन्यात कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी खासदार रक्षाताई खडसे यांनी जळगाव जिल्ह्यात केंद्रीय समितीचे पथक पाठवण्याची मागणी आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्याकडे केली होती. त्या मागणीनुसार 20 जून रोजी केंद्रीय आरोग्य समितीचे सदस्य डॉ अरविंद अलोने वरिष्ठ प्रादेशिक संचालक आरोग्य व कुटुंब कल्याण पुणे आणि डॉ एस डी खापर्डे सल्लागार सार्वजनिक आरोग्य यांनी जळगाव जिल्ह्यात दौरा करून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला होता व गंभीर रुग्णांना आवश्यक व्हेंटिलेटरची संख्या कमी असल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता जास्त आहे असे निरीक्षण नोंदवले होते.

 कोरोनाच्या गंभीर रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. कारण गंभीर रुग्ण अधिक आणि व्हेंटिलेटर अगदी कमी, अशी अवस्था निर्माण होत आहे. यासाठीच खासदार रक्षाताई खडसे यांनी रावेर लोकसभा क्षेत्रातील कोरोनाच्या गंभीर रुग्णासाठी तातडीने व्हेंटिलेटर उपलब्ध व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीला यश मिळून पंतप्रधान सहायता निधीमधून रावेर लोकसभा क्षेत्रातील चोपडा येथे 9, जामनेर येथे 10, मुक्ताईनगर येथे 10 व भुसावळ येथे 10 व्हेंटिलेटर मिळाले असल्याने आरोग्य यंत्रणेला बळकटी मिळाली आहे.

जळगाव जिल्ह्यात  कोरोनामुळे दररोज रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. यात गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर मिळत नसल्याने व्हेंटिलेटरच्या प्रतीक्षेत जीव गमवावा लागत असल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यावर कोरोनाचे मोठे संकट ओढवले आहे. रुग्णांमध्ये कोरोनासोबतच इतरही गंभीर स्वरूपाच्या आजारांची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांची प्रकृती गंभीर असते. परिणामी, त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासते. त्यानुसार डॉक्टरही रुग्णाला व्हेंटिलेटर लावण्याचा सल्ला देतात; परंतु सद्य:स्थितीत गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपलब्ध व्हेंटिलेटर अपुरे पडत आहेत. ऐनवेळी आवश्यक सुविधा न मिळाल्याने रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. या व्हेंटिलेटरमुळे कोरोनाच्या गंभीर रूग्णांना दिलासा मिळून त्यांचा जीव वाचवता येईल अशी आशा खासदार रक्षाताई खडसे यांनी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!