भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावताज्या बातम्या

रावेर शहरातील निवडक भाग अशांत क्षेत्र म्हणुन घोषित करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव !

रावेर (प्रतिनिधी) । रावेर शहरात लॉकडाऊनच्या दरम्यान २२ मार्चला झालेल्या दंगली नंतर प्रशासन सतर्क झाले असुन दंगलीत झालेली नुकसान भरपाई दंगलखोरा कडून वसूल करण्याचा प्रस्ताव अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला आहे.

शहरात वारंवार होणार्‍या जातीय दंगलीमुळे शहरातील निवडक भाग अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या कडून अपर मुख्य सचिव गृह विभाग यांना आज प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. सदरील प्रस्तावामध्ये रावेर शहरातील गांधी चौक, खाटीक वाडा, नागझिरी भाग, भोई वाडा,संभाजी नगर, रसलपुर नाका,लेंडीपूरा,कोतवालवाडा,महात्मा फुले चौक, चावडी चौक, शिवाजी चौक, पंचशील चौक, मन्यार वाडा, हातेशा मस्जिद थळा भाग, पाराचा गणपती, आठवडे बाजार, बंडु चौक, इमामबाडा या क्षेत्रास अशांत क्षेत्र घोषित करण्याचा प्रशासन विचार करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याला सचिवांनी मान्यता दिल्यास संबंधीत क्षेत्र हे कायम अशांत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात येणार आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!