भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

रुग्णालयातील कोविड बाधितांना नातेवाईकच पोहोचवतायत पार्सलद्वारे दारू आणि तंबाखू

मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।

यवतमाळ (प्रतिनिधी): – कोरोना बाधित रुग्णांना नातेवाईकच दारू आणि तंबाखू पुरवठा करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोना बाधित रुग्णांची राज्यात संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली आहे मात्र, या परिस्थितीत कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांकडूनच नियमांचे उल्लंघन करत रुग्णाचा जीव धोक्यात टाकल्याचा प्रकार यवतमाळ जिल्ह्यात समोर आला आहे.

होय, ही घटना घडली आहे यवतमाळ जिल्ह्यातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. मात्र, या ठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांचे नातेवाईकच त्यांना दारू आणि तंबाखू पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोना बाधित रुग्णांना उपचार सुरू असताना दारू, तंबाखू, सिगारेट यांचे व्यसन करण्यास मनाई आहे. मात्र, व्यसन असलेल्या नागरिकांना याशिवाय चैन पडत नाही आणि या वस्तू मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. यवतमाळमध्ये सुद्धा असाच प्रकार उघडकीस आला आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांकडून पार्सलद्वारे दारू आणि तंबाखू पुरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.

येथे उपचार घेत असलेल्या बाधितांपैकी एका रुग्णाच्या नातेवाईकाने बाहेरून खाद्यपदार्थ देण्याच्या नावाखाली चक्क दारू आणि तंबाखूचा पुरवठा करण्याचा बेत आखला. त्यानुसार तो व्यक्ती रुग्णाला पार्सलद्वारे हे घेऊनही गेला मात्र, सुरक्षारक्षकांनी तपासणी केली असता पार्सलमध्ये दारू आणि तंबाखू असल्याचं उघडकीस आलं आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. जर रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईकच अशा प्रकारे कृत्य करत असतील तर कोरोना आटोक्यात येणार तरी कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!