भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयरावेर

रोहिणी खडसे यांनी साधला रावेर तालुक्यात ग्रामस्थां समवेत संवाद

खिर्डी, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी : रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या चोविसाव्या दिवशी रावेर तालुक्यातील रेंभोटा, वाघाडी, शिंगाडी, खिर्डी खु, खिर्डी बु येथील ग्रामस्थां सोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

जनसंवाद यात्रेत जिल्हा परिषद सदस्य कैलास सरोदे, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यु डी पाटील, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, प. स. सदस्य योगिता वानखेडे, दिपक पाटील, प्रदिप साळुंखे, युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे, रावेर शहराध्यक्ष मेहमूद भाई, कुणाल महाले, सचिन महाले, रविंद्र पाटील, मनोहर तायडे, सुरेश कोळी, अमोल महाजन, किशोर पाटील, योगेश्वर कोळी, सिद्धार्थ तायडे, किरण नेमाडे, गफूर कोळी, पवन चौधरी, पंकज राणे, राजु महाजन, निळकंठ बढे, गणेश देवगिरीकर, हैदर भाई, सलमान भाई, रोहन च-हाटे,अतुल पाटील, मनोहर कोळी, मोहन कचरे, प्रफुल शिरनामे,  भुषण पाटील, विशाल रोटे, चेतन राजपुत, नवाज पिंजारी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

यावेळी ग्रामस्थां सोबत संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या, रावेर तालुक्यातील हा भाग गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुका पासून मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राला जोडला गेला आहे तेव्हापासून कायम हा भाग नाथाभाऊ यांच्या पाठीमागे उभा राहिला नाथाभाऊ यांनी सुद्धा विकास कामांना भरगोस निधी उपलब्ध करून दिला. गावातील मुलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला आपसापास नातेसबंध वाढले नाथाभाऊ यांनी विकासकामे करताना कुठलाही भेदभाव केला नाही गाव तेथे बुद्धीविहार हि संकल्पना राबवली या सर्व विकास कामांमुळे तुम्ही आतापर्यंत नाथाभाऊ यांना साथ दिली तशीच साथ कायम राहू द्या व जास्तीत जास्त संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद व्हा असे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!