भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावरावेर

लुमखेड़ा येथे रेशन दुकानातील फलक झाले गायब,पुरवठा विभागाचे दुर्लक्ष…

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

लुमखेडा ता.रावेर (प्रतिनिधी)रावेर तालुक्यातील तापी नदी किनारी असलेल्या लूमखेड़ा येथे धान्य दुकाना मध्ये दुकानाचा नंबर ,नाव व दक्षता समिती या पैकी कोणत्याही प्रकारचे माहिती दर्शक फलक लावण्यात आले नाहीत तसेच ऑनलाईन ई पास मशीन द्वारा बोटाचे ठसे घेऊन ग्राहकाना धान्य वाटप केले जाते. अनेक वेळा जागृत ग्राहकानी पावतीची मागणी करुन देखील त्याना विविध प्रकारचें कारणे देत टाळा टाळ केली जात असून शासनाने शिदा पत्रिकेतिल कालाबाजार रोखण्याकरिता बायोमेट्रिक प्रणालीचा अवलंब करण्यात आला असून वेळोवेळी तांत्रिक कारणे देत ग्राहकाची फसवणूक केली जाते रेशन दुकाना वरुन भाव फलक व माहिती दर्शक फलक गायब असल्यामुळे शासनाची आदेशाची पाय मल्ली होत आहे भाव फलक नसल्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे
याकडे पुरवठा विभागाने जाणीव पूर्वक दुर्लक्ष केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे

अन्य धान्य गोरगरीबांना वाटप करण्यासाठी रेशन दुकानदाराणा विविध नियम वाली लावण्यात आली आहे लाभार्थयाची लूट होउ नये म्हणून दूकानदाराने भाव फलक व माहिती दर्शक फलक लावणे सक्तीचे असून सुद्धा लुमखेड़ा येथे रेशन दुकानदार शासनाचा नियमाची पायमल्ली करत आहे या मुळे ग्राहकमधे संभ्रम निर्माण होत आहे सबंधित दुकानदारा कडून अव्वा सव्वा च्या पैसे घेऊन धान्य वितरण केले जाते की काय आसा प्रश्न उपस्थित केला जात आहे धन्य दुकानात दर पत्रक व फलक नसल्यामुळे धान्य दुकानाची तपासणी करुण योग्य ती करवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे तसेच गोरगरीबाना स्वस्त दरात अन्न धान्य विक्री करण्याची भूमिका केन्द्र व राज्य शासनानी घेतली नसून हे अन्न धान्य सवलतीच्या दरात व योग्य प्रमाणात घेण्या करिता रेशन दुकानात भाव फलक उपलब्ध साठा तक्रार वही ठेवणे बंधन कारक आहे तसेच तक्रार पेटी असणे आवश्यक आहे मात्र दुकानदारा कड़े तक्रार वही सुध्दा आढळून आलेली नाही रेशन दुकानदाराला पुरवठा विभागा कडून अभय मिळत आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे या सर्व प्रकाराकडे तसेच प्रशासना ने वेळीच लक्ष देऊन सबंधिताची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मांगणी करण्यात येत आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!