भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

लॉकअपमध्ये मोबाईल चित्रीकरण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (प्रतिनिधी)। शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात येऊन लॉकअपमध्ये असलेल्या आरोपींशी संभाषण करीत मोबाईलमध्ये चित्रीकरण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात महावितरण कार्यालयात गोंधळ घातल्याप्रकरणी चाळीसगाव येथील संशयितांना कोठडीत ठेवण्यात आले आहे. शनिवारी सकाळी ११.३० वाजता प्रवीण मराठे, रा.चाळीसगाव हे लॉकअप रूम जवळ आले. लॉकअपमध्ये असलेल्या आरोपींशी त्यांनी संभाषण केले आणि त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण देखील केले. पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आल्याने प्रवीण मराठे यांना ताब्यात घेत गोपनियतेचा भंग केल्याने त्यांच्याविरुद्ध पोलीस नाईक राजेंद्र ठाकरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!