भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

लॉकडाउन नियमांचे उल्लंघन केल्याने मुक्ताईनगरात २ व्यावसायिकांवर गुन्हा नोंद !

मुक्ताईनगर (प्रतिनिधी)। जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने डोके वर काढत पाय पसरवायला सुरवात केली असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात लॉकडाऊन परिपत्रक जारी करत काही बंधने घातलेली आहे याचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला जात असून मुक्ताईनगर शहरातील आज दि.२ मार्च रोजी दोन व्यावसायिकांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने व्यावसायिकांनमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील भारत बूट हाऊसचे मालक शेख परवेज शेख निसार व महावीर ऑटो पार्ट्स चे मालक महावीर दिलीपचंद बोथरा यांनी व्यवसाय करताना आस्थापना सुरू असताना विना मास्क राहून सामाजिक आरोग्य धोक्यात येईल असे कृत्य केल्याचे नगरपंचायतीचे कर्मचाऱ्यांच्या अचानक केलेल्या पाहणीत आढळून आले. दरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड भरा व मास्कचा वापर करा अशा सूचना पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधितांना दिल्या मात्र आम्ही दंड भरणार नाही व मास्क वापरणार नाही असे दोघे व्यावसायिकांनी पवित्रा घेतला या प्रकरणी सामाजिक आरोग्य धोक्यात येईल असे कृत्य करणे दंड भरण्यास नकार देणे जिल्हाधिकारी क्र दंडप्र-01कावि/571/2021दि17/03/2021 व क्र दंडप्र 01 कावि/583दि.01/03/2021 या आदेशांचे उल्लंघन केल्याची फिर्याद नगर पंचायत कर्मचारी गणेश प्रल्‍हाद कोळी यांनी दिल्याने भारत बूट हाऊस चे मालक शेख परवेज शेख निसार व महावीर ऑटो पार्ट चे महावीर दिलीपचंद बोथरा अशा दोघे व्यवसायिकांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!