भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

वरणगांव फॅक्टरी जीएम यांची तडका-फडकी बदली

भुसावळ (प्रतिनिधी)। तालुक्यातील वरणगांव आयुध निर्माणीचे महाप्रबंधक एस.चटर्जी यांची तडका फडकी बदली कानपूर करण्यात आलेली आहे. त्याचा निरोप समारंभ खुपच हर्ष उल्हासात आज दि ५ डिसेंबर २०२० रोजी करण्यात आला आहे.

यावरती सामाजिक कार्यकर्ते संजय खन्ना यांनी आक्षेप घेतला आहे.यांच्या मते निर्माणी वरणगांवचे महाप्रबंधक हे घोटाळेबाज आहेत. महाप्रबंधक यांनी गोड बोलून गडगंज माल निर्मितीत दाबण्यात यशस्वी झाले आहेत.तसेच यांना सहकार्य तिन युनियन ने केलेले असून यात अधिकारीही सोबत आहेत असा ते दावा संजय खन्ना करीत आहेत.महाप्रबंधक यांनी बोगस एलटीसी क्लेम तसेच डेप्युटेशन मान्य केलेले आहेत याचे पुरावे आहेत. यांनी निर्माणी बोर्डाने यांना दिलेल्या सरकारी वाहनाचा दुरुपयोग केलेला आहे, अॉन ड्युटी सरकारी ड्रायव्हरला घेऊन यांनी वाहन निर्माणी कार्यक्षेत्राच्या बाहेर नेलेले आहे याचे चित्रण युट्युबहून खन्ना यांनी मिळवलेले आहे.अशा घोटाळेबाज महाप्रबंधकवरती सीबीआय इन्कावयरी व्हावी असे यांनी पत्र डिफेन्स सेक्रेटरीला दिलेले आहेत,तसेच यांची मालमत्तेची तपास करावा व मालमत्ता जप्ती का करु नये असा दावा खन्ना यांनी केलेला आहे.

महाप्रबंधकवरती अकाऊंट अनुभागाने स्क्रैप घोटाळ्याचाही आरोप केलेला आहेच. याची सुध्दा गुप्त तपासनिचे मेल यांनी पाठवलेले आहेत. वुमन अशोशिऐशन मधेही एक दोन कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने अध्यक्षा यांनी कंत्राटी महीला कामगार स्टाफ यांचे शोषण केलेले आहे याचे चेअरमन बोर्डाने दखल घेतली होती त्या अनुषंगाने ही बदली झाली आहे आणि पेमेंट करायची आदेश दिले होते. यासोबत भरपूर गोष्टींचा उलगडा करण्याचा दावा खन्ना करतांना दिसत आहेत. वरणगांव आयुध निर्माणीचे महाप्रबंधक एस.चटर्जी यांची तडका फडकी बदली कानपूर करण्यात आलेली असून यांच्या जागी महाप्रबंधक जबलपूर येथील संजय राऊत वरणगांव आयुध निर्माणी येथील पदभार आजरोजी सांभाळणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!