भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयरावेर

वाढीव व अवाजवी वीज देयकात दुरुस्ती करा- सावदा भाजपाची मागणी

सावदा (प्रतिनिधी)। शहरातील वीज ग्राहकांना कोरोनाच्या संसर्ग काळात लॉकडाऊनमुळे मीटर रिडींग न घेता आल्याने ग्राहकांना जी देयके देण्यात आली ती अवाजवी व अवास्तव आकारण्या करून देयके देण्यात आलीत यामुळे आज गुरुवार रोजी सावदा भाजपा तर्फे विनंती वजा ईशारा देत निवेदन उपअभियंता यांना देण्यात आले.

याबाबत अधिक असे की, लॉकडाऊनमुळे मीटर रिडींग न घेता आल्याने ग्राहकांना जी देयके देण्यात आली ती अवाजवी व अवास्तव आकारण्या करून देयके देण्यात आलीत ग्राहक देयक दुरुस्ती करता आला असता त्याला उडवा उडवीचे उत्तर देऊन समाधान न करता त्याला वीज बिल भरण्यास बाध्य करण्यात आले व मानसिक छळ करण्यात आला असे निवेदनात म्हटले असून पुढे म्हटले आहे की, सदरची पार्श्वभूमी लक्षात घेता आम्ही विनंती वजा इशारा देत  आहोत कि, ग्राहकांना पाठविण्यात आलेल्या अवास्तव व अवाजवी वीज देयकात दुरुस्ती करण्याच्या दृष्टीने आपण तातडीने विशेष कक्षाची निर्मिती करून त्याद्वारे ग्राहकांचे अवास्तव वीज देयके विनाविलंब दुरुस्त करून देण्यास प्राधान्य द्यावे तसेच दुरुस्त केलेल्या वीज देयकांची रक्कम सुलभ हफ्त्यांत भरण्याची ग्राहकांना मुभा देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली असून तसेच असे न झाल्यास भारतीय जनता पार्टी तर्फे वीज ग्राहकांना न्याय मिळवून देण्याचे उद्देशाने आपणाविरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल व होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील,.. सकारात्मक कार्यवाही होईल या अपेक्षेत असे निवेदनात नमूद करण्यात आले असून, निवेदनावर भाजपा शहर अध्यक्ष पराग पाटील, जगदीश बढे, सारिका चव्हाण, पंकज येवले, अजय भारंबे, विश्वास चौधरी, मुराद तडवी, संजय चौधरी, गजानन भार्गव, महेश चौधरी व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!