वादळामुळे कोसळले पुन्हा शेतकऱ्यांच्या आयुष्यात दुःखाचे डोंगर……
रोझोदा ता.रावेर (विवेक चौधरी)। रोझोदा,कोचूर, सावखेडा, चिनावल सह संपूर्ण परिसरात दिनांक १९-०९-२०२० रोजी ०५:२५ संध्याकाळी आले वादळी पाऊस वादळाचं रूप डोळ्यात न टिपण्याचे सारखं होते….. जगाचा पोशिंदा शेतकरी राजाला परत दुःखाचा डोंगरातुन जावं लागत आहे केळीबाग, हायब्रीड यासारख्या पिके अक्षरशः जमीनदोस्त झालेल्या अवस्थेत आढळून आले आहेत.या आधी जास्त पावसामुळे उडीद,मूगाचे नुकसान झाले होते , त्यातून बाहेर निघत नाही तोच केळी ,हायब्रीड या सारखी पिके आलेल्या पाऊस व वादळाने जमीन दोस्त झालेली दिसत आहे.आता अशा परिस्थितीत करावं काय....
हाच प्रश्न समस्त शेतकरी बांधवांना पडला आहे…
शेतकरी जगाला पोसतो त्या शेतकऱ्या वर आज दुःखाचा डोंगर पसरला आहे शासनाने नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करून मदत करावी अशी मागणी केली जात आहे . भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो , कृषिप्रधान देशात शेतकरी एवढा दुःखी असेल तर कृषिप्रधान देश म्हणून घ्यायचा आपल्याला काहीही हक्क नाही……