वाळू प्रकरणात महसूल कडून पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कारवाईचा देखावा, मंडळ अधिकारी जगताप आणी देवरे यांचा मोठा प्रताप.
यावल (सुरेश पाटील)। तालुक्यात 6 पैकी 5 मंडळातून वाळूची अवैध वाहतूक तस्करी खुलेआम सर्रासपणे सुरू आहे (यावल मंडळ वगळता कारण यावल मंडळात सर्कल आणि तलाठी सतत वाळू वाहतूक दारांवर दंडात्मक कारवाई करीत आहे आहे ) परंतु काही सर्कल आणि तलाठी यांचे खास विश्वासातील पंटर आणि मध्यस्थीने वाळू वाहतूक करणारे डंपर आणि ट्रॅक्टर चालकांशी संगनमत करून मासिक हप्ते निश्चित करून अवैध वाळु वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करताना पोलिसांच्या खांद्यावर कारवाईची बंदूक ठेवून एकूण 6 मंडळाधिकारी पैकी दोन मंडळ अधिकारी आपले कार्यक्षेत्र सोडून यावल मंडळातील वाळू व्यवसायिकांना त्रास देऊन आपला प्रताप दाखवित असल्याने काही कॉन्ट्रॅक्टर आणि वाळू व्यवसायिकात तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे याकडे यावल तहसीलदार यांचे दुर्लक्ष होत असल्याचे सुद्धा यावल तालुक्यात बोलले जात आहे.
दिनांक 29 रोजी दुपारी यावल तहसील कार्यालयात तालुक्यातील सर्कल तलाठी यांची मीटिंग झाली मीटिंग संपल्यानंतर पाच वाजेच्या सुमारास किनगाव आणि बालोद मंडळाधिकारी यांना अवैध वाळू वाहतूक पकडण्याची कर्तव्यदक्षता लक्षात आल्याने त्यांनी यावल तहसील समोरून जाणारे वाळूचे ट्रॅक्टर पकडून कर्तव्यदक्षतेचा मोठा देखावा नायब तहसीलदार आर.के. पवार व यावल पोलीस यांच्या समक्ष उपस्थित केला यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता. यावल नगरपरिषदेच्या गटार आणि रस्ता बांधकाम सुरू असल्याने वाळूची रॉयल्टी परस्पर बिलातून कपात झाली असल्याचे संबंधित ठेकेदार यांनी इस्टिमेट दाखविल्यावर वाळूचे ट्रॅक्टर सोडून द्यावे लागले. तालुक्यातील पश्चिम विभागातील किनगांव मंडळ कार्यक्षेत्रातून संपूर्ण यावल तालुक्यात दररोज रात्रंदिवस गिरणा नदी पात्रातील वाळू ठराविक एक ते दोन डंपर तसेच इतर ट्रॅक्टरच्या माध्यमातून आणि कोळन्हावी जवळील तापी नदी पात्रातील आणि किनगांव परिसरातील नदी नाल्यांमध्ये वाळू ट्रॅक्टर डंपरद्वारे अवैध वाळू वाहतूक सर्रासपणे सुरू आहे किनगांव मंडळात वाळू वाहतूक करणाऱ्यांकडून कोणी तरी दरमहा तीन हजार रुपये प्रत्येक ट्रॅक्टर चालकाकडून तर पाच ते सहा हजार रुपये प्रत्येक डंपर चालकाकडून कोण वसूल करीत आहे आणि आणि यात सर्कल आणि तलाठी यांचा सहभाग आहे का ? आणि सहभाग नसेल तर अवैध वाळू वाहतूक दारांवर किनगांव मंडळात दंडात्मक कार्यवाही का झालेली नाही तसेच किनगांव मंडळात अवैध वाळू डंपर आणि ट्रॅक्टर वाहतूक दारांवर दंडात्मक कारवाई का झालेली नाही
याची चौकशी फैजपूर भाग प्रांताधिकारी यावल तहसीलदार यांनी केल्यास वाळू तस्करीचा मोठा गोरख धंदा आणि वाळू प्रकरणातील हप्ते बाजी आणि यावल मंडळातच म्हणजे यावल तहसील जवळील परिसरातच वाळू वाहतूक करणाऱ्यावर आणि यावल पोलिसांना घटनास्थळी तात्काळ बोलावून दंडात्मक कारवाई का होत आहे याचा मोठा प्रताप उघडकीस येईल आणि अवैध वाहतूक प्रकरणाकडे आणि नियुक्त भरारी गस्ती पथकाकडे संबंधित नायब तहसीलदार यांचे सुद्धा दुर्लक्ष होत आहे का ? असे किनगांव आणि साकळी मंडळात बोलले जात आहे. किनगांव मंडळ अधिकारी आणि भालोद मंडळ अधिकारी यांनी आपल्या आतापर्यंतच्या कार्यकाळात आणि कार्यक्षेत्रात किती वाळू वाहतूक तस्करांवर दंडात्मक कारवाई केली तसेच त्यांनी आपले कार्यक्षेत्र सोडून इतर मंडळात किती वाळू तस्करांवर आतापर्यंत कारवाई केलेली आहे याची चौकशी केल्यास किनगांव आणि भालोद सर्कल यांच्या कर्तव्यदक्षतेचा मोठा प्रताप महसूलसह जनतेच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे. महसूलच्या मनमानी कारभाराबाबत काही वाळू तस्कर हप्ते बाजीला म्हणजे लाच देण्यास वैतागले असून असून यावल तालुक्यात लवकरच लाचलुचपत विभागामार्फत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.
वाळू वाहतुक डप्पर फोटो आज दिनांक 3 शनिवार रोजी रात्री चा आहे ही वाळू वाहतूक महसूल खात्याला मोठे आवाहन आहे.