विलास ताठे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर
मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।
रावेर ,ता रावेर ( प्रतिनिधी )
राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विलास ताठे (कुंभारखेडा) यांना ‘समाजभूषण २०२०-२१’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ यांनी दिली.
यापूर्वीहि त्यांना फुले शाहू आंबेडकर बहुउद्देशीय संस्था यांच्या कडून उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, लोकशाही साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त समाजसेवक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे, तसेच कोरोना काळात उत्तम कार्य, कोरोना विषयी मार्गदर्शन पर सुचना, माहिती , जागृती निर्माण व्हावी म्हणून प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना ही अनमोल सहकार्य केल्याबद्दल शासनाच्या वतीने करोना योध्दा सन्मान पत्र देवून सत्कार करण्यात आला आहे.विलास ताठे हे मराठा मूक मोर्चा समन्वयक मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे, जलसमाधी आंदोलनात सहभागी होणे अशा अनेक समाजोपयोगी कार्यामुळे संभाजी ब्रिगेड रावेर तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच मराठा- दलित मेळाव्याचे यशस्वी कार्यक्रम राबविले. तसेच कोरोनाच्या महामारीत विलास ताठे यांनी आपले सामाजिक कर्तव्य यशस्वीपणे पार पाडली आहेत. या काळात त्यांनी जवळपास तीन हजार अल्बम ३० आयुर्वेदिक औषधी गोळ्यांचे वाटप रावेर तालुक्यातील विविध खेड्यापाड्यात केले आहे.