भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयताज्या बातम्याराष्ट्रीय

विस्तार वादाचे युग संपले, हे विकास वादाचे युग; पंतप्रधान मोदींचे चीनला खडे बोल !

लडाख दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जवानांना संबोधित केले. आज संपूर्ण देशाचील जनता आपल्यापुढे म्हणजेच आपल्या देशाच्या सैनिकांपुढे आदरपूर्वक नतमस्तक होत नमन करत आहेत. आज प्रत्येक भारतीयाची छाती तुमचे शौर्य आणि पराक्रमामुळे फुगलेली आहे. असे सांगतानाच विस्तारवादाचे युग संपले असून आता विकासवादाचे युग आले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी चीनला इशारा दिला आहे.

नवी दिल्ली:

भारतीय जवानांनी संपूर्ण जगाला आपहे साहस दाखवले असून संपूर्ण देश भारतीय सैनिकांपुढे आदरपू्र्वक नतमस्तक आहे, अशा शब्दांत गौरव करताना

भारतीय जवानांनी संपूर्ण जगाला आपहे साहस दाखवले असून संपूर्ण देश भारतीय सैनिकांपुढे आदरपू्र्वक नतमस्तक आहे, अशा शब्दांत गौरव करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला खडे बोल सुनावले आहेत. आज विस्तारवादाचे युग संपले असून आता विकासवादाचे युग आले आहे, असा शब्दांत मोदी यांनी चीनला इशारा दिला आहे. संपूर्ण लडाख हा भारताचा आत्मसन्मान आहे, असे महत्त्वाचे विधानही पंतप्रधान मोदी यांनी सैनिकांना संबोधित करताना केले आहे.

पंतप्रधान मोदी लडाख दौऱ्यावर असून त्यांनी लेहमधील नीमूला भेट दिल्यानंतर रुग्णालयात जात जखमी जवानांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या २० जवानांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी जवानांना संबोधित केले.

आज संपूर्ण देशाचील जनता आपल्यापुढे म्हणजेच आपल्या देशाच्या सैनिकांपुढे आदरपूर्वक नतमस्तक होत नमन करत आहेत. आज प्रत्येक भारतीयाची छाती तुमचे शौर्य आणि पराक्रमामुळे फुगलेली आहे. १४ कोअरच्या शौर्याचे किस्से सगळीकडे पसरले आहेत. संपूर्ण जगाने तुमचे अदम्य साहस पाहिले आहे. आपल्या शौर्यगाथा घराघरात दुमदुमत आहे. भारताच्या शत्रूंनी तुमची आगही पाहिली आहे आणि तुमचा रागही पाहिलेला आहे, असे मोदी सैनिकांना उद्देशून म्हणाले.

मोदींनी चीनला सुनावले

आता विस्तारवाद समाप्त झाला असून आता हे युग विकासवादाचे आहे. जलदगतीने बदलणाऱ्या या काळात विकासवाद हाच प्रासंगिक आहे. विकासवादाला आज संधी आहे आणि विकास हाच आधार आहे. गेल्या शतकात विस्तारवादानेच मानवजातीचा विनाश केला. कोणाच्या डोक्यात जर विस्तारवादाची जिद्द असेल तर ते नेहमीच विश्वशांतीपुढे एक संकट ठरते, अशा शब्दात मोदींनी चीनला सुनावले.

दोन मातांचा विचार करून घेतो निर्णय- मोदी

जेव्हा जेव्हा देशाच्या रक्षणाशी संबंधित निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा मी सर्वप्रथम मातांचे स्मरण करतो. पहिली माता आमची भारत माता आहेत आणि दुसरी त्या वीरमाता ज्यांनी सैनिकांना जन्म दिला, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी सैनिकांचा गौरव केला.

शत्रूंनी तुमची उत्कटताही पाहिली आणि राग देखील पाहिला

आपल्या सैनिकांचे बाहू पर्वतासारखे आहेत. आपल्या सैनिकांचा पराक्रम संपूर्ण जगाला माहीत आहे, अशा शब्दांत मोदी यांनी सैनिकांचा गौरव केला. शत्रूंनी आपल्या सैनिकांचा उत्साह, उत्कटताही पाहिली आहे आणि त्यांचा राग देखील पाहिलेला आहे, असेही मोदी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!