वीजबिल विरोधात मुक्ताईनगर येथे भाजपचे आंदोलन
मुक्ताईनगर (प्रतिनिधी)। लॉकडाउनच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीजबिले आली. याबाबत जनआक्रोश निर्माण झाल्यावर सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी जाहीर केले पण आता या सरकारच्या ऊर्जामंत्र्यांनी वीजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकांना ती भरावीच लागतील असे स्वतः स्पष्ट सांगितले आहे. दुसरीकडे महावितरण सक्तीने वीजबिल वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे.
महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला असून या सरकारला सतेच्या धुंदीतून जागे करून जनतेला वीजबिलात सवलत देण्यासाठी भाग पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टी मुक्ताईनगर तर्फे खासदार रक्षाताई खडसे, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे राष्ट्रीय संयोजल डॉ. राजेंद्रजी फडके, माजी जिप अध्यक्ष अशोकभाऊ कांडेलकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून निवेदनदेण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष नजमाताई तडवी, पंस उपसभापती विद्याताई विनोद पाटील, पंस सदस्य राजेंद्र सावळे, पंस सदस्य शुभांगीताई भोलाने, भाजयुमो विधानसभा क्षेत्रप्रमुख दत्ता पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, नगरसेवक ललित महाजन, नगरसेवक पियुष महाजन, नगरसेवक मुकेश वानखेडे, नगरसेवक संतोष कोळी, तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाने, रिपाई ( आ ) तालुकाध्यक्ष विक्रम हिरोळे, विनोद पाटील गुणवंत पिवटे, प्रभाकर महाजन निखिल महाजन साहेबराव पाटील शकील खा करीम खा व कार्यकर्ते उपस्थित होते