शासकीय वाहनासह वाळूतस्करांची भजे,पोहा पार्टी, यावल शहरात चर्चेचा विषय…प्रांताधिकारी व तहसीलदार खुलासा करतील का ?
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल दि.17(सुरेश पाटील)। यावल शहरात आज दि.17 बुधवार रोजी सकाळी8:30ते9वाजेच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणारे तसेच वाळूतस्करांची भजे आणि पोहा नाश्ता खाण्याची पार्टी झाली.यावेळी शासकीय वाहनासह ते कोण कोण कर्मचारी उपस्थित होते? याची प्रत्यक्षदर्शींनी पाहणी केल्याने यावल शहरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
यावल येथील बस स्टँड जवळ तसेच जुन्या तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन पासून काही अंतरावर असलेल्या यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने बांधलेल्या जे.टी.महाजन व्यापारी संकलनात भजे पोहा शेव चिवडा नाष्टा पाण्याचे दुकान आहे या दुकानात आज सकाळी अवैध वाहतूक करणारे आणि वाळूची तस्करी करणारे यांची बहुसंख्येने कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर ठेवून भजे,पोहा पार्टी झाली.यावेळी भजे दुकानापासून काही अंतरावर रस्त्यावर डिव्हायडर/दुभाजक असल्याने विरुद्ध दिशेने एक शासकीय वाहन सुद्धा पार्किंग केलेले होते.एवढ्या सकाळी शासकीय वाहन त्याठिकाणी कसे उभे होते यांनी रात्रीच्या वेळेस वाळू तस्करांवर कुठे आणि काय कारवाई केली?वाळू तस्करी करणाऱ्यांची अर्थपूर्ण मैत्री कोणा कोणाशी आहे असा प्रश्न उपस्थित केला जात असून भजे पोहा पार्टीत त्या शासकीय वाहनातील तालुक्यातील 2ते3जबाबदार कर्मचारीसुद्धा सहभागी असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले यामुळे तसेच यावल शहरासह परिसरात सर्रासपणे वाळू वाहतूक बिनदिक्कतपणे होतं असल्याने या सर्व प्रक्रियेत राजकीय सामाजिक प्रभावामुळे संबंधित अधिकारी हतबल झालेले दिसून येत आहेत,वाळू व इतर गौण खनिजांची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रॉली डंपर महसूल किंवा पोलिसांनी पकडले असता संबंधित शासकीय यंत्रणेवर मोठे राजकीय-सामाजिक दडपण येत असते,
यामुळे बऱ्याच वेळा पकडलेली वाळूची वाहने नाम मात्र कारवाई करून महसूलला सोडून द्यावी लागतात ही यावल तालुक्यातील वस्तुस्थिती आहे राजकीय प्रभावामुळे वाळू तस्कर कोणालाही घाबरत नसल्याने आमचे कोणी काहीच वाकडे करू शकत नाही अशी वस्तुस्थिती निर्माण झालेली आहे तरी प्रांताधिकारी कैलास कडलक,तहसीलदार महेश पवार,पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेवून नियोजन करून सापळे रचुन वाळू तस्करांना कायद्याची जाणीव करून द्यावी तसेच भजे पार्टीत कोण कोण सहभागी होते? याची चौकशी करून जनतेच्या माहितीसाठी खुलासा करून कार्यवाही करावी असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.