रावेरशैक्षणिक

शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्या बद्दल शेख हनीफ सर Jewel of India Excellence Awards पुरस्काराने सन्मांनित

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

सावदा (प्रतिनिधी)। सावदा येथील शेख हनीफ शेख रशीद हे शिक्षकी पेशात 2001 पासुन सेवेत असून त्यांनी आजपावेतो अनेक उल्लेखनीय शैक्षणिक कार्य केले आहे. 2005 पासुन ते शिक्षकांच्या,विद्यार्थ्यांच्या हिता साठी उर्दू शिक्षक संघटनेत अनेक पदावर राहुन समस्या सोडवल्या CET ,TET संदर्भात असो की अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती त्यांनी सन 2010 पासुन अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना चे प्रदेशाध्यक्ष पदावर राहुन उर्दू शिक्षकांचे ,शाळा व विद्यार्थ्यांसाठी शासना समोर भुमिका मांडुन अनेक प्रश्न मार्गी लावले. सन 2015 मध्य मा.एकनाथरावजी खडसे साहेब अल्पसंख्यांक मंत्री असतांना शेख हनीफ यांना महाराष्ट्र शासनाची राज्य उर्दू साहित्य अकादमी मुंबई वर सदस्य पदी नेमणुक करण्यात आली .त्यांनी या माध्यमातून राज्यात उर्दू भाषा विकासासाठी अनेक कार्य केले. शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची लायकी मुळे ते नाथा भांऊ चे विश्वासाचे कार्यकरता मानले जातात.त्यांची कट्टर नाथा भाऊ समर्थक म्हणून ओळख निर्माण झाली आहे.

सन 2019 मध्य त्यांची सावदा येथील इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीत संचालक पदावर निवड झाली ,त्यांनी सर्व संचालकांना पदॎधिकार्यांना सोबत घेऊन संस्था द्वारा संचालित अँग्लो उर्दू हायस्कुल सावदा साठी संस्थेची इमारत बांधुन शाळेला उपलब्ध करुन दिली 30 वर्षाहून अधिक काळा पासुन शाळेला इमारत नव्हती .अल्पसंख्यांक समाजासाठी उच्च शिक्षणाची व्यवस्था करणे त्यांचा मुख्य उद्देश्य आहे. रसूलपुर ,वाघोदा येथे सेवेत असतांना शाळा डिजीटल करुन त्यांनी नाव लौकीक केले आहे राज्यात त्यांचे उर्दू व मराठी भाषांसाठी, राज्यात राष्ट्रीय एकात्मता दृढ करण्यासाठी केलेले कार्याीची दखल मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांनी घेतली असून शेख हनीफ यांना नुकतेच आॕनलाईन कॉनफ्रन्स मध्य JEWEL OF INDIA EXCELLENCE AWARD 2020 देऊन सन्मांनित केले आहे
या बद्दल त्यांचे मा.नाथा भाऊ यांनी, यावल चे माजी प्राचार्य अ.रऊफ सर, फैजपुर चे माजी प्राचार्य रफिक शेख सर, इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष अकबर खान, सचिव शेख सुपडू, चेयरमन शेख इकबाल, व्हा चेअरमन अकरम खान, रफिक शेख, मुख्तार अली तसेच सावदा न पा चे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे नगरसेवक फिरोजं खान सावदा चे इतर मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!