संभाजी बिडी हे नाव बदलण्यासाठी शिवशंभू प्रतिष्ठान आक्रमक !
दहिगाव ता.यावल (प्रतिनिधी)। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे राष्ट्रीय महापुरुष आहेत .त्याच्या जीवनात त्यांनी कधीही कोणत्याही प्रकारचे व्यसन केले नाही,आणि त्याच महापुरुषाचा नावाचा वापर बिडी तंबाखू सारख्या आरोग्यास हानिकारक पदार्थासाठी केला जात आहे,तरी आज शिवशंभु प्रतिष्ठान च्या वतीने यावल तहसील साहेबांना निवेदन देण्यात आले ,कि महापुरुषाच्या नावाने चालणारे बिडी तंबाखू यासारखे पदार्थ बंद झाले पाहिजे.कोणत्याही उत्पादक व व्यापऱ्यांनी पुन्हा असल्या कोणत्याही महापुरुषाच्या नावे उद्योग धंदे करू नये.
यावल तहसील साहेबांना निवेदन देते वेळी शिवशंभु प्रतिष्ठान च्या तालुका अध्यक्ष कविता ज्ञानेश्वर पाटील,मयूर पाटील,कोमल पाटील,भूषण पाटील,योगेश पाटील,चंद्ररेखा मास्तरी,सुष्मा पाटील,सुजित पाटील व योगेश माळी उपस्थित होते……