भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

“सरकारचे शेतकऱ्यांकडे अतिशय दुर्लक्ष, युरीया खतांच्या तुटवड्या वरून, नाथाभाऊ महाविकास आघाडीवरती कडाडले!

जळगाव (प्रतिनिधी): महाराष्ट्रात युरिया खताचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर भाजपा जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भाष्य केले आहे. “मी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांवर अशी वेळ कधीही येऊ दिली नाही” असे म्हणत खडसेंनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

“शेतकऱ्यांवर युरिया खत ब्लॅकने घेण्याची वेळ आली आहे. ज्यादा दराने घ्यावे लागत आहे, पण तेही मिळत नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. मी कृषिमंत्री असताना अशी वेळ शेतकऱ्यांवर कधीही येऊ दिली नाही” असे खडसे म्हणाले. “मी पाच वर्ष कृषिमंत्री असताना एकदाही खताची टंचाई निर्माण झाली नाही. त्यावेळी समन्वय होता. नीटनेटकेपणाने त्यावेळी खताचा पुरवठा व्यवस्थित होत होता. युरिया खताचे दर हे स्थिर ठेवले. आता मात्र सरकारमधील कोणाचाच समन्वय राहिलेला नाही” असे म्हणत खडसे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधल्याचे चित्र आहे.

“साठेबहाद्दरांनी मोठ्या प्रमाणात युरिया साठवून ठेवल्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. सरकारने यावर कठोर कारवाई करावी” अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. “सरकारचे शेतकऱ्यांकडे अतिशय दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. साठेबहाद्दरांनी मोठ्या प्रमाणात युरिया साठवून ठेवल्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे” असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!