साखरपुड्याला गेले आणि लग्न लावून आले
फैजपूर (प्रतिनिधी)। फैजपुर मध्ये नुकतेच साखरपुड्यातच लग्न लावल्याने समाजात एक आदर्श निर्माण केला गेला या निर्णयाचे कवतुक केले जात आहे.
येथील तहानगर रहिवासी अकिल हाजी गुलाब पिंजारी यांची कन्या कौसर बी अकील पिंजारी राहणार फैजपुर तालुका यावल हे पिंजारी मंसुरी जमात चे सदस्य आहेत आणि रहेमान सुपूर्द पिंजारी यांचा मुलगा नवरदेव साबीर रहीम पिंजारी राहणार जिल्हा बडवाणी तालुका पानसमल गाव खेतिया मध्यप्रदेश येथील रहिवासी असून याचा फैजपूर तालुका यावल येथे नुकताच साखरपुडा आयोजित करण्यात आला होता, साखरपुडा आयोजित कार्यक्रमात समाजातील काही प्रतिष्ठीत लोकांनी व नातेवाईकांनी एक चांगला निर्णय घेऊन साखरपुडा आटोपल्यानंतर ऐतिहासिक निर्णय घेऊन साखर पुड्यातच लग्न लावले या ऐतिहासिक निर्णयामुळे समाजात हा एक चांगला , वेगळा आदर्श निर्माण केला गेला, आजच्या कोरोनाच्या लॉकडाऊन च्या गंभीर परिस्थितीत एक चांगला निर्णय घेतल्यामुळे लाखो रुपयांची बचत झाली असून असे निर्णय सर्व स्तरांतील समाजबांधवांनी पुढाकार घेऊन करण्याची गरज आजच्या काळात असल्याने अशायोग्यवेळी निर्णयामुळे समाजात एक आदर्श निर्माण झाला आहे त्यामुळे येथील रहिवासी अकील गुलाब पिंजारी तसेच रहमान सुपडू पिंजारी व समाजातील प्रतिष्ठित लोकांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे