भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

सातपुड्यातील लोहारा येथील सुकी नदीतील स्वच्छताअभियान , स्तुत्य उपक्रम

लोहारा ता. रावेर (प्रतिनिधी): रावेर तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी असलेल्या लोहारा गावातील समाजसेवक,सामाजिक कार्यकर्ता हसन रुबाब जमादार यांनी लोहारा येथील सुकी नदीतील साफसफाई,स्वच्छता करण्याचा तीन दिवसीय उपक्रम हाती घेतला आहे,

याबाबत अधिक माहिती अशी की,लोहारा येथुन जाणाऱ्या सुकी नदीला नेहमी पुर येतो,आणि या पुरामुळे लोहारा येथील सुकी नदीचा पुल लहान अरुंद असल्याने या पुलाजवळ सातपुडा जंगलातुन वाहत आलेली झाडे,झुडपे या पुलाच्या पाईपांमधे अडकुन पडतात,यामुळे सुकी नदीचे पाणी हे पुलावरुन वाहते,आणि या पुलावर जागोजागे मोठमोठे खड्डे असल्याने परिसरातील जनतेला रहदारीला खुप अडथळा निर्माण होऊन कुसूंबा आणी लोहारा गावासह अनेक गावांचा संपर्क तुटतो,कधी-कधी तर पुराचे पाणी जास्त आल्यास या पुलावर गुरे-ढोरांसहित मानवी जिवितहानी देखील होणे नाकारता येत नाही,ही सगळी परिस्थिती लक्षात घेत समाजसेवक हसन जमादार यांनी सुकी नदीतील झाडे,झुडपेंची साफसफाई करण्याचा 3 दिवसीय उपक्रम हाती घेतला आहे,त्यांच्या ह्या मेहनती कार्यामुळे,आरोग्य विभागाचे अधिकारी,कर्मचारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक,सरपंच,महिला व गावकऱ्यांकडुन कौतुक केले जात आहे,कारण आजपासुन सलग तीन दिवस हा साफसफाईचा उपक्रम सुरु राहणार म्हणजेच 22 सप्टेंबर पर्यंत हसन जमादार हे लोहारा येथील सुकी नदीतील साफसफाईचे काम स्वतः मेहनत करुन सुकी नदीतील साफसफाई करीत आहेत.या प्रसंगी हसन जमादार यांच्या सोबत कादर तडवी,पिरखा तडवी,जुम्मा तडवी हे त्यांना सहकार्य करीत असून हसन जमादार यांच्या ह्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!