सावदा दुय्यम निबंधक कार्यालयात भ्रष्टाचाराचा कळस; सरकारी फी च्या ” १००” पट रक्कम केली जाते वसुल
सावदा (विशेष प्रतिनिधी)। येथील दुय्यम निबंधक कार्यालयात कष्टकरी शेतकरी व सामान्य ग्राहकांची आर्थिक पिडवणूक करून अवैध मार्गाने पैसे कमावण्याचा चांगलाच जोरदार फंडा संबंधित महाशयांनी थाटला असून पैसे कमावण्याचा गोरख धंदा सर्रास सुरू आहे,
सावदा दुय्यम निबंधक कार्यालयात बदलून येणारा अधिकारी वरिस्ट अधिकाऱ्यांचे “ ” हात ” चांगलेच ” ओले “ करून येत असतो ,कारण हे कार्यालय जिल्ह्यात क्रमांक ” एक ” चे शासनाला सर्वात जास्त महसूल देणारे दुय्यम निबंधक कार्यालय असून ज्या ठिकाणी सर्वात जास्त व्यवहार त्या ठिकाणी सर्वात जास्त कमाई,असे सूत्र असते, या कार्यालयात सूची क्र. २ च्या नकलांना सरकारी फी “पाच” रूपये अधिकृत असताना प्रत्यक्षात मात्र ” पाचशे ” रुपये घेतली जातत्, म्हणजे सरकारी किमतीच्या ” १०० % “ जास्त घेतली जाते, हा भ्रष्ट्राचाराचा कळस नव्हे तर काय ? आणि हे सर्व वरिष्ठांच्या आशीर्वादानेच का.. ?
आधीच जगाचा पोशिंदा असलेल्या कष्टकरी शेतकऱ्यांना शेतीत काही उत्पन्न मिळत नाही, सतत च्या अतिवृष्टी मुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, निसर्गाच्या अवकृपे शेतकरी हवालदिल झाल्याने शेतकऱ्यांना ” पिक कर्जाची “ आवश्यकता असते, हे पीक कर्ज राष्ट्रीयकृत बँकांकडून घेण्यासाठी शेतकऱ्यांना ” डिक्लेरेशन “ घ्यावे लागते ,ह्या डिक्लेरेशन साठी प्रत्यक्षात कोणतीही फी लागतं नसताना , मात्र या ठिकाणी डिक्लेरेशन घेणे करीता ५०० रुपये घेतले जातात , म्हणजे आधीच त्रस्त झालेल्या हवालदिल शेतकऱ्यांची ही येथे आर्थिक लूट केली जाते, ” जगाचा पोशिंदा असलेला शेतकऱ्यांची ही अशी आर्थिक पिळवणूक कशासाठी ? “ आपली खडगी भरण्यासाठी कष्टकरी शेतकरी राज्याची व सामान्यांची आर्थिक पिळवणूक सर्रास खुलेआम पणे होत आहे. तसेच मूल्यांकना साठी प्रत्यक्ष सरकारी फी १०० रुपये असताना ,३०० रुपये घेतले जातात……. तूर्त एव्हढेच…! ………( भाग – ३ )
हेही वाचा- सावदा दुय्यम निबंधक कार्यालयात अडवणूक, ग्राहकांची आर्थिक लुट,,,,,,,,,,!