सावदा पोलिसांची गावठी दारू भट्ट्यावर धाड; एपीआय इंगोलेची अवैध व्यावसायिकांवर पहिलीच कारवाई
सावदा (प्रतिनिधी)। सावदा पोलीस स्टेशन हद्दीत जानोरी गावी भवानी नाल्याच्या काठी सपोनि देविदास इंगोले व पोउपनी राजेंद्र पवार यांनी पथकासह गावठी दारूच्या भट्ट्यावर धाड टाकून धडक कारवाई करण्यात आली आहे.
सावदा पोलीस स्टेशन हद्दीत जानोरी गावी भवानी नाल्याच्या काठी सपोनि देविदास इंगोले व पोउपनी राजेंद्र पवार यांनी पथकासह गावठी दारूच्या भट्ट्यावर धाड टाकून सुमारे १४०००/-रु किमतीचा ७००लिटर गुळ व मोह मिश्रित कच्चे रसायन २००लिटर मापाच्या प्लास्टिक च्या ७ टाक्या मध्ये भरलेले रसायन जागेवरच सांडून टाक्या तोडून फोडून नाश केल्या व या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस उप निरीक्षक देविदास इंगोले हे गेल्या काही दिवसांपूर्वी सावदा पोलिस स्टेशनला रुजू झाले असता आल्याआल्याच त्याची ही पहिलीच कारवाई असून अवैध व्यावसायिकांवर ची ही कारवाईची सुरुवात खेड्या पासून सुरू होऊन शहरा पर्यंत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.