भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

सावदा येथील कोविड-१९ तपासणी शिबिरात ४ अहवाल पॉझिटिव्ह !

सावदा (प्रतिनिधी)। शहरात नगरपालिका प्रशासना अंतर्गत कोरोना विषाणू तपासणीसाठी रॅपिड अँटीजन टेस्ट व आरटीपीसीआर टेस्ट शिबार गेल्या तीन दिवसांपासून घेण्यात येत आहे, त्यात आज एकूण ११० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यात ४ रुग्णांचे कोरोना तपासणी अहवाल बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

आज घेण्यात आलेल्या कोविड -१९ तपासणीसाठी स्लॅब सॅम्पल घेण्याकरिता आरोग्य यंत्रणेकडून कुणीही न आल्याने नगरपालिका कर्मचारी यांनी स्वत: टेस्टिंग केली या कोविड-१९ साठी तपासणी शिबिरात मध्ये एकूण ११० जणांची तपासणी करण्यात आली त्यात १०६ तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ४ कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात एक ३१ वर्षीय पुरुष, दोन महिला २५ वर्षीय व २६ वर्षीय रुग्ण गांधी चौक परिसरातील रहिवासी आहे तर एक ४२ वर्षीय पुरुष रुग्ण देवकर वाडा येथील रहिवासी आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये शिबिरात २४६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सदरील शिबिरास सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी भेट दिली.

सावदा शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या १०७ झाली असुन त्यात १० मयत, १२ उपचार घेत आहेत व बाकी सर्व कोरोनाला मात देत घरी परतले आहे.

मंडे टू मंडे तर्फे आवाहन –

कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!