सावदा येथील “त्या” “ब-हाणपूर – अंकलेश्वर ” महामार्गावरील हॉटेलवर छुप्या मार्गाने मद्य विक्रीसुरू,पुढून बंद मागून सुरू
मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।
सावदा – ( प्रतिनिधी )सावदा येथे कोरोना पार्श्वभूमीवर कडक निर्बंध सुरू असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश आहेत, हॉटेल व्यवसायिकांना सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत फक्त जेवण पार्सल सुविधाच सुरू ठेवण्याचे आदेश आहेतअसें असताना हॉटेलवर पार्सल सुविधांच्या नवा खाली मद्यविक्री सुरू असल्याचे नागरिकांमध्ये आच्चर्य व्यक्त केले जात आहे.
तथापी ब-हाणपूर – अंकलेश्वर महामार्गावरील एका हॉटेल मध्ये मात्र सर्रास पार्सल चे नावा खाली अवैधरीत्या मद्य विक्री सुरू आहे, येथे रात्री उशीरा पर्यंत धडाक्याने ही विक्री सुरू असते दारू मिळत नसल्याचा फायदा घेत सदर ठिकाणी देशी व विदेशी दोन्ही प्रकारचे मद्य चढ्या भावाने विक्री होत आहे,
समोरून बंद मागून सुरू
केव्हा हॉटेलच्या पुढील बाजूने तर केव्हा हॉटेलच्या मागील बाजूने, तर केव्हा मागील बाजूस असलेल्या नगरपालिकेच्या नवीन बांधकाम होत असलेल्या कॉम्प्लेक्स च्या आड अवैध मद्य विक्री केली जाते.
विशेष म्हणजे सदर बंद काळात अवैध पणे दारू मिळणारे एकमेव हॉटेल असून हे हॉटेल मुख्य रस्त्यावर व बस स्टॅन्ड पोलीस चौकी पासून हाकेच्या अंतरावर असून देखील सर्वाने समोर हा प्रकार येथे सुरू असूनही या बाबत पोलीस व दारुबंदी खाते यांचे याकडे लक्ष जात नाही का ? अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात आहे का ? असा प्रश्न नागरिकांचे मनात निर्माण होत आहे, एकीकडे कोरोनाचे नावाखाली सर्वसाधारण व्यापारी आपली दुकाने दिवसभर बंद ठेऊन आपले नुकसान होत असताना देखील प्रशासनास सहकार्य करीत आहेत असे असताना दुसरीकडे मात्र असे प्रकार घडत असतील तर सर्वसामान्य जनतेचा प्रशासना वरील विश्वास नक्कीच कमी होईल म्हणून सदर हॉटलेवर कडक कार्यवाही होणे अपेक्षित असल्याचे बोलले जाते.
सदर प्रकारा बाबत बातमी प्रसिद्ध झाली असता थातूर-मातूर कारवाई करून संबंधितांवर केस दाखल न करता दुसरा व्यक्ती देऊन त्याचेवर केस करण्यात येते त्या नंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे.. सादर प्रकार बंद व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान आज संपूर्ण बंद असताना सुद्धा इंदिरा गांधी चौकातील एक किराणा दुकान व संभाजी मार्केट मधील किराणा दुकान सुरू होते ही दुकाने प्रशासनाने बंद करायला लावली.