राजकीयरावेर

सावदा येथील नगरसेवक चौधरी अपात्र– जिल्हाधिकाऱ्याचे आदेश

जळगाव (प्रतिनिधी)। येथील नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी २००६ ते २०११ या कालखंडात पत्नी नगराध्यक्षा असताना पदाचा दुरुपयोग करीत मालमत्ता करात फेरफार करून नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान केले. म्हणून त्यांच्याविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे नगरसेवक अजय भागवत भारंबे यांनी तक्रार दाखल केली होती. या अर्जावर आज ७ डिसेंबर रोजी आदेश देण्यात आला, असून तक्रारदार यांचा अर्ज मंजूर करून यातील सावदा येथील नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना नगरसेवक या पदावरून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अपात्र घोषित केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!