भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिक

सावदा येथील प्राथमिक विद्या मंदीरात आदर्श शिक्षक गुणगौरव सोहळा संपन्न

सावदा (प्रतिनिधी)। येथील लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ सावदा संचलित प्राथमिक विद्या मंदीर या शाळेत शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी ५ सप्टेंबर २०२० रोजी आयोजित असलेला आदर्श शिक्षक गुणगौरव सोहळा २६ आक्टोबर रोजी यावल रावेर मतदार संघाचे आ.शिरीष चौधरी यांच्या हस्ते ममता राणे नर्सरी फैजपूर रोड सावदा या ठिकाणी पार पडला.

या वेळी संस्थेने ज्ञानाची ज्योत कायम तेवत राहावी म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका उषा तायडे मँडम, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक रविंद्र दगडू वारके तसेच पदवीधर शिक्षक गणेश सुकदेव सापकर यांना चांदीचे पदक,सन्मानपत्र, शाल-श्रीफळ,गुलाबपुष्प देवून त्यांच्या कार्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार देवून त्यांना सन्मानित केले. सदर प्रसंगी आ,शिरीष चौधरी यांनी शिक्षण संस्था शिक्षकांचा गुणगौरव करण्यामागील कारण विशद करतांना सर्वशिक्षक ज्ञानदानाचे काम करतच असतात व त्यातील काही विशेष शिक्षक इतरांना प्रेरणा मिळावी असे कार्य करीत असतात त्यांच्या या कार्याची संस्था दखल घेवून त्यांना सन्मानित करीत असते.ही लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाची ही कार्यप्रणाली अनुकरणीय आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. तसेच शाळेचे माजी विद्यार्थी राजेंद्र चौधरी यांनी शाळेची महती व शिस्त विषयी माहिती सांगितली त्याच प्रमाणे गटशिक्षणाधिकारी शैलेश दखने यांनी मनोगत व्यक्त करतांना वयाच्या १५ व्या वर्षी भारतीय वंशाच्या मुलीने कोरोना सारख्या दुर्धर आजारावर संशोधन करुन आपला देश,आई,वडिल व शिक्षक यांची मान उंचावली असे मनोगत व्यक्त केले पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका उषा तायडे मँडम यांनी शिक्षकांचा चार अवस्था सांगून संस्थेने दिलेली कौतुकाची थाप व त्यातून कार्याला मिळणारी प्रेरणा व्यक्त केली.शाळेची माजी विद्यार्थिनी कु.साक्षी सापकर हिने शिक्षक हा बागेतील माळी असून त्याने लावलेले विद्यार्थी रुपी असलेल्या लहान रोपट्याचे अनमोल मार्गदर्शनाने कसे सक्षम वटवृक्षात रुपांतर करतात व जीवनातील प्रत्येक परिस्थितीसाठी त्याला कसे तयार केले जाते याद्वारे शिक्षकांची महती वर्णन केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे अध्यक्ष दिनानाथ रामचंद्रराव देशमुख यांनी भुषविले.प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मोरेश्वर राणे यांनी केले.सदर कार्यक्रमास सावद्याच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा अनिता पंकज येवले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, गटशिक्षणाधिकारी शैलेश दखने, विस्तार अधिकारी एच.एम.तडवी, संस्थेचे सर्व संस्था चालक,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कल्पेश शिवदे सर यांनी तर आभार सुलोचना लोखंडे मँडम यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करुन कार्यक्रम पार पाडला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!