सावदा येथील ” हिंदू दफनभूमी” जागा ठराव रद्द केल्याचा विरोधातील उपोषण तूर्त स्थगित
मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।
सावदा ( प्रतिनिधी ) येथे हिंदू समाजासाठी दफनभूमी करीता गट नं.८ मध्ये अनआरक्षित जागेत दि ,29/10/2018 रोजी मागणी केली असता सदर मागणी नुसार सावदा नगरपालिकेने पालिकेच्या मालकीच्या जागेत 1 हेक्टर जागा जनरल मिटिंग चा ठराव करून मंजूर केली होती .
सदर मंजूर ठरावाच्या विरोधात जिल्हाधिकारी जळगाव याचे कडे ‘ तो ‘ मंजूर केलेला ठराव रद्द करण्याची मागणी एका तक्रारी द्वारे केली गेली होती, नगरपालिकेने सदर तक्रारींवर जिल्हाधिकारी यांना हिंदू दफन भूमीच्या बाजूने पॉझिटिव्ह अहवाल दिला असताना ही मा,जिल्हाधिकारी यांनी सदर नगरपालिकेने हिंदू दफन भूमी साठी मंजूर केलेला ठराव रद्द केला , त्या निकालाच्या विरोधात नगरपालिकेने अपिलात जावे या करिता नगरपालिकेला पत्र दिले असून त्या संदर्भात सावदा नागरिकाच्या वतीने शरद गिरधर भारंबे,व जितेंद्र किसन भारंबे यांनी दि 5 एप्रिल रोजी नगरपालिके समोर साकळी उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता,उपोषण पत्राची दखल घेत पालिकेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी हिंदू दफनभूमी जागा संदर्भात समाधान कारक लेखी आश्वासन दिल्याने दि 5 एप्रिल 2021 रोजी होणारे साकळी उपोषण तूर्त रद्द करण्यात येत असल्याचे शरद भारंबे व जितेंद्र भारंबे यांनी सांगितले .
मुख्याधिकारी व नगराध्यक्ष याचे लेखी आश्वासन
आपण सादर केलेल्या मागणी साठी सावदा नगरपालिका प्रशासनाचा दृष्टीकोन हा सकारात्मक असून लवकरच या बाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल तसेच मा, जिल्हाधिकारी याचे निर्णय विरोधात अपिलात जाणे करिता विषय पुढील सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्याचे आश्वासन देऊन उपोषणास न बसण्याची विनंती करून ,तो पर्यंत दफनविधी साठी पर्यायी व्यवस्था करण्याचेही मुख्याधिकारी सौंरभ जोशी व नगराध्यक्षा अनिता येवले यांनी सांगितले.