सावदा वासीयांनसाठी दिलासादायक; तपासणी अहवाल निगेटिव्ह !
सावदा.ता.रावेर (प्रतिनिधी)। सावदा येथील काल बाधित आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल आज दुपारी प्रशासनाला प्राप्त झाले आहे.
फैजपुर कोविड सेंटर येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संपर्कातील ९ व्यक्तींचे स्लॅब तपासणीसाठी नेण्यात आले होते त्यातील व्यक्तीच्या तपासणी अहवाला प्राप्त झाला असून घेतलेल्या ९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. त्यातील एकाच कुटुंबातील ८ तर १ इतर कुटुंबातील व्यक्तींचा समावेश असून सदरील अहवाल सावदा वासीयांना दिलासा देणारे आहे.
सावद्यातील रुग्ण संख्या ६२ झाली असुन त्यातील ९ मयत आहेत तर २ उपचार घेत असून बाकी सर्व कोरोना मात देत घरी परतले आहेत.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.