भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्यारावेर

सावदा शहरात पुन्हा गराडी बुवा चौक, बुधवार पेठेतील एक रुग्ण बाधित !

सावदा (प्रतिनिधी) । काल रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणी अहवालात सावदा येथील संशयित रूग्णांचे स्वॅब काही दिवसांपूर्वी तपासणीसाठी घेण्यात आले होते. सदरील रूग्ण कोरोना अहवाल बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. आता एकुण 46 रूग्ण कोरोना बाधित झाले आहे. अशी माहिती मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दुजोरा दिला आहे.

सदरील रुग्ण जळगाव येथे उल्हास पाटील कोविड सेंटर मध्ये उपचार घेत होता रात्री उशिरा आलेल्या अहवाल अंती कोरोना बाधित आढळून आला आहे. रुग्ण गराडी बुवा चौक बुधवार पेठ येथील 64 वर्षीय पुरुष आहे. रुग्णांचा रहिवासी असलेला परिसर प्रशासनाकडून सील करण्यात येत असुन सदरील रुग्णांच्या संपर्कातील 7 व्यक्तींना कॉरंटाइन करण्यात आले आहे. सदरील वृत्तास मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दुजोरा दिला आहे.

सावदा शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या 46 झाली असुन त्यात 7 मयत, 10 उपचार घेत आहेत व बाकी सर्व कोरोनाला मात देत घरी परतले आहे.

मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!